Maharashtra Politics Latest News: मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (19 जून) जाहीर सभेत बोलताना थेट शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव घेतलं. या घोटाळ्याला (Scam) ठाकरेच जबाबदार असल्याचे आरोप त्यांनी केलं. तसंच याच प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT देखील स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. आता शिंदे-फडणवीसांच्या या खेळीनंतर उद्धव ठाकरेंनीही लागलीच दुसरा डाव टाकला आहे. (mumbai municipal corporation scam sit shinde fadnavis govt uddhav thackeray march 1 july maharashtra politics latest news)
ADVERTISEMENT
मागील वर्षभरात महापालिका निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सध्याचं सरकार हे महापालिकेचा वारेमाप पैसा वापरत असून आतापर्यंत 9 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. हाच भ्रष्टाचार उघड करण्यासाठी शिवसेना (UBT) आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरेंनी टाकला नवा डाव
‘एक वर्ष होऊन गेलं.. पण महापालिकेची निवडणूक झालेली नाही. पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहे. निवडणुका घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. लोकांची कामं, सेवा कशी करायची?, पैसा उधळला जातोय, खर्च केला जातोय. त्याला जाब विचारणारं कोणीच नाही. मुंबई महापालिकेत वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबापच कोणी राहिलेला नाही. जे काही आहे ते लुटालूटच सुरू आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे.’ अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली.
‘या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आणि आदित्य करेल. एक काळ असा होता की, मुंबई महापालिका 650 कोटी तुटीत होती. त्यानंतर शिवसेनेने कारभार जेव्हा सांभाळला तेव्हापासून आतापर्यंत 92 हजार कोटींच्या ठेवीपर्यंत कारभार गेला आहे.’
हे ही वाचा >> ‘देवेंद्र फडणवीस सध्या ‘नावडाबाई’ झालेत…’, उद्धव ठाकरेंनी काढली खपली!
‘हे सगळे पैसे महापालिकेचे होते असं नाही. यात काही ठेवी होत्या. त्या ठेवींमधून अनेक प्रकल्प देखील सुरू आहेत. मग ते कोस्टल रोड असेल किंवा इतर योजना पार पडत होत्या. आता कोणत्याही कामासाठी बेधडकपणे महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या कानावर असं आलं की, जवळपास 9 हजार कोटी हे एफडीमधून वापरण्यात आले आहेत. हा जनतेचा पैसा आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे.’
‘याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा.. कारण अडीच वर्षाच्या काळात… जे काही आहे.. मग 92 हजार कोटीच्या ठेवी राहिल्या कशा? त्यात सगळे लोकप्रतिनिधी तेव्हा होते. कॅगच्या अहवालात तसं काहीच नाही. महापालिकेचा हिशोब हा साथरोग कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा होता त्यावेळेला सुद्धा कंत्राटाशिवाय कोणतीही गोष्ट झालेली नाही.’
हे ही वाचा >> UN : ‘शिंदेंची बंडखोरी, गद्दार दिवस’! संजय राऊतांचं आंतरराष्ट्रीय राजकारण
‘माननीय पंतप्रधानांनी सुद्धा पंतप्रधान मदत निधी काय होता.. त्यावर जाब विचारणारा कोणी ठेवलाच नाही. पण महापालिकेच्या खर्चावर सगळ्यांचं लक्ष होतं. त्यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. एकूणच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.. ते याला. स्वत:च चोर.. चोर ओरडलं. म्हणजे ओरडण्याऱ्याला सोडून दुसऱ्याकडे बघतात.’
‘आम्ही त्यांचा भेसूर चेहरा समोर आणला आहे. सातत्याने रस्त्यात कसा घोटाळा झाला हे मांडतो आहोत. त्याचंच एक मोठं स्वरुप हा मोर्चा असेल.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT