Maharashtra Politics latest News: मुंबई: ‘महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) केलेली युती किंवा युतीचा (allaince) निर्णय ही एक चूकच होती.’ असं मोठं विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी केलं आहे. मुंबई Tak च्या ‘चावडी’ (Mumbai Tak Chavadi) या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणापासून देशातील राजकीय घडामोडींवर दिलखुलासपणे उत्तर दिलं. याचवेळी त्यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत एक वक्तव्य केलं आहे. ज्यावरुन आता नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे. (mumbai tak chavadi bjp leader vinod tawade shiv sena bjp allaince mistake)
ADVERTISEMENT
‘2014 ला भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर पुन्हा 2019 मध्ये युती करण्याची गरज नव्हती. शिवसेनेशी युती करणं ही भाजपची चूक होती. ज्याचा फटका हा भाजपला बसला. असं मला वाटतं’ असं विनोद तावडे ‘चावडी’वर बोलताना म्हणाले.
2019 विधानसभा निवडणूक युतीत लढणं ही भाजपची चूक होती?
या प्रश्नावर तावडे म्हणाले की, ‘2019 साली काही जणांचं मत होतं की, शिवसेनेसोबत युती करावी, काहींच्या मते युती करू नये असं होतं. मला त्यावेळी वाटत होतं की, भाजपने युती करायला नको हवी होती. गरज नव्हती. ज्यापद्धतीने आपण मागील वर्षात सेनेबाबत पाहत होतो. अडचण अशी होती की, शिवसेनेला दुय्यम भूमिका बजावणं हे त्रासाचं होतं, खूपच त्रासाचं होतं. सेना लीडरशीपला कधीच हे चालणार नाही.’
‘त्यामुळे मला असं वाटतं की, त्याआधीच्या जागावाटप व्हायचा.. महापालिका वैगरे.. त्यावेळी त्यांना एक तरी अधिक जागा जास्त हवी असायची. 2014 ला सुद्धा युतीत एक जागा जास्त राहू द्या. हा जो माइंडसेट आहे ना.. तो त्यांचा असल्यामुळे दुय्यम भूमिका ही कधीच त्यांना चालणार नाही.’
‘दोन प्रकारचे मतप्रवाह असतात. त्यात माझं मत होतं की, युती नसती केली तर चांगलं झालं असतं.’ असं म्हणत विनोद तावडे यांनी 2014 प्रमाणेच भाजपने 2019 साली देखील शिवसेनेसोबत युती करायला नको होती असं मत व्यक्त केलं आहे.
‘2019 ला शिवसेना असा दगाफटका करेल.. हे कल्पनेतही नव्हतं…’
‘मुळात 2019 ला युती केल्यानंतर या प्रकारे दगाफटका करेल हे कल्पनेतच नव्हतं. शिवसेनच्या दृष्टीने त्यांचा तेवढ्यापुरता फायदा झाला असेल. पण दूरच्या दृष्टीने.. सगळ्यात महत्त्वाचं बाळासाहेब आणि शिवसेनेसाठी काय महत्त्वाचं होतं. दिलेला शब्द पाळतात.. हा त्यांचा राजकारणातील महत्त्वाचा गुण होता. शिवसेनेची ओळख काय होती की, शब्द दिला तो पाळला… तीच ओळख 2019 ला उद्धव ठाकरेंनी पुसली. ज्यामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये त्याची खूप चर्चा आहे.’ असं म्हणत विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आता विनोद तावडेंच्या या टिकेला शिवसेना (UBT) नेते यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याशिवाय मुंबई Tak च्या चावडीवर विनोद तावडेंनी अनेक गौप्यस्फोटही केले आहेत. लवकरच ही संपूर्ण मुलाखत आपल्याला मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनेलवर देखील पाहता येईल.
ADVERTISEMENT