ठाकरेंचा दणका! भाजप खासदाराच्या 'लाडक्या बहिणी'चा निवडणुकीत पराभव

मुस्तफा शेख

27 Sep 2024 (अपडेटेड: 27 Sep 2024, 10:46 PM)

Mumbai University Senate Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर यायला सूरूवात झाली आहे. त्यानूसार ठाकरे गटाच्या युवासेनेने या निवडणुकीत 7 जागांवर मुसंडी मारली आहे. 10 जागांवर ही निवडणूक पार पडली होती. आणि ठाकरेंच्या युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत होत होती.

 mumbai university senate election result 2024 udhhav thackeray shiv sena ubt yuvasena won 7 seat nisha sawara lost election

भाजप खासदाराच्या बहिणीचा पराभव

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप खासदाराच्या बहिणीचा निवडणुकीत पराभव

point

ठाकरेंच्या युवासेनेच्या उमेदवाराची बाजी

point

ठाकरेंच्या युवासेनेने निवडणुकीत 7 जागा जिंकल्या

Mumbai University Senate Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर यायला सूरूवात झाली आहे. त्यानूसार ठाकरे गटाच्या युवासेनेने (Yuvasena) या निवडणुकीत 7 जागांवर मुसंडी मारली आहे. 10 जागांवर ही निवडणूक पार पडली होती. आणि ठाकरेंच्या युवासेना आणि अभाविपमध्ये (ABVP) थेट लढत होत होती. या निवडणूकीत आता 7 जागा जिंकून ठाकरेंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा दणका दिला आहे. तसेच या निवडणुकीत भाजपच्या खासदारच्या (BJP MP) लाडक्या बहिणीचा पराभव झाला आहे. ठाकरेंच्या उमेदवाराने हा पराभव केला आहे. त्यामुळे या निकालाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (mumbai university senate election result 2024 udhhav thackeray shiv sena ubt yuvasena won 7 seat nisha sawara lost election) 

हे वाचलं का?

पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या बहीण निशा सावरा यांनी देखील सिनेट निवडणूक लढवली होती. अनुसुचित जमाती प्रवर्गातून एबीवीपीच्या उमेदवार निशा सावरा आणि युवासेनेचे डॉ. धनराज कोहचाडे यांच्यात थेट लढत झाली होती. या लढतीत धनराज कोहचाडे यांना 5 हजार 247 मतं पडली आहेत. तर निशा सावरा यांना फक्त 918 मतं पडली आहेत. त्यामुळे निशा सावरा यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे निशा सावरा यांचे वडील हे विष्णू सावरा हे माजी आदिवासी मंत्री आहेत. 

हे ही वाचा : Exclusive: 'माझा एन्काउंटरवर विश्वास नाही, पण...', अक्षय शिंदे चकमकीवर फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 2024 निकाल

युवासेना धनराज कोहचाडे : 5247
ABVP निशा सावरा : 918

युवासेनेचे राखीव गटातील विजयी उमेदवार

  1. मयुर पांचाळ - युवासेना - 5350 मते, ओबीसी प्रवर्ग
  2. शितल देवरुखकर शेठ  - 5498 मते- SC प्रवर्ग
  3. डॉ. धनराज कोहचाडे- 5247 मते - ST प्रवर्ग
  4. स्नेहा गवळी- महिला 
  5. शशिकांत झोरे - NT प्रवर्ग
  6. प्रदीप सावंत - खुला प्रवर्ग
  7. मिलिंद साटम - खुला प्रवर्ग
  8. अल्पेश भोईर - खुला प्रवर्ग
  9. परमात्मा यादव - खुला प्रवर्ग

मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदाधिकाऱ्यांच्या जागाकरीता मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडले होते. सध्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होत आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी युवासेना आणि अभाविपने सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर छात्रभारतीने चार, मनसेने एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून एकही उमेदवारी सिनेटच्या निवडणुकीत उतरवण्यात आलेला नाही. 

    follow whatsapp