Nagpur Violence Mastermind: निवडणूक लढवणारा 'हा' नेताच निघाला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, फोटोही आला समोर..

Nagpur Violence Mastermind Name: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड कोण आहे हे आता समोर आलं आहे. मुख्य आरोपी म्हणून या मास्टरमाइंडचं नाव FIR मध्ये देखील टाकण्यात आलं आहे.

Nagpur Violence Mastermind

Nagpur Violence Mastermind

योगेश पांडे

19 Mar 2025 (अपडेटेड: 19 Mar 2025, 05:39 PM)

follow google news

Mastermind of Nagpur Violence: नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी (17 मार्च) झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड नेमका कोण हे अखेर आता समोर आलं आहे. या दंगलीचा सूत्रधार फहीम शमीम खान नावाचा माणूस असल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. त्यानेच लोकांना भडकावले आणि गर्दी जमवली. ज्यानंतर नागपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला.

हे वाचलं का?

नागपूर पोलिसांचा दावा आहे की, 38 वर्षीय फहीम शमीम खान याच्या भाषणानंतरच नागपुरात हिंसाचार उसळला. त्याच्यावर समुदायाला भडकवण्यासाठी प्रक्षोभक भाषणे दिल्याचा आरोप आहे. तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDp) चा नागपूर अध्यक्ष आहे.

फहीम खान

निवडणूक लढवणाराच निघाला हिंसाचाराचा मास्टरमाईंड

फहीम शमीम खान याने 2024 ची निवडणूक नागपूर लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. 2024 च्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्याने भाजप नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवली होती. दरम्यान, हाच फहीम खान हा नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याने आता समोर आले असून त्याचे नाव देखील  FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे.

फहीम खानने लढवलेली लोकसभा 2024 ची लोकसभा निवडणूक

हे ही वाचा>> Nagpur Violence : "हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग", FIR मध्ये काय म्हटलंय?"

नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी झालेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या वादाने सोमवारी अचानक हिंसक वळण घेतलं. नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर मोठ्या हिंसाचार उसळला.

महाल परिसरानंतर रात्री उशिरा हंसपुरीत देखील हिंसाचार झाला. यावेळी अज्ञात लोकांनी दुकानांची तोडफोड केली आणि वाहनांना आग लावली. यादरम्यान जोरदार दगडफेकही झाली. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी हिंसाचारानंतर अनेक भागात कर्फ्यू लागू केला. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी 60 हून अधिक दंगलखोरांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा>> Nagpur Violence : "दूध आणायला गेलेला मुलगा व्हेंटीलेटरवर, रेल्वे पकडायला निघालेला भाऊ ऑक्सिजनवर"

औरंगजेबाच्या कबरीबाबत नेमका का य वाद आहे?

अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता, त्यानंतर औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा हा चांगलाच चर्चेत आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत विधान केलं होतं. तर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाला एक चांगला शासक म्हणून संबोधले होते. तसेच औरंगजेब क्रूर नव्हता असंही मत त्यांनी व्यक्त केलं होतं. ज्यामुळे या सगळ्या वादाला तोंड फुटलं होतं.

चित्रपटांमधून औरंगजेबाची चुकीची प्रतिमा सादर केली जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. तेव्हापासून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचबाबत काही नेत्यांनी आणखी विधानं करून अधिक हवा दिली. ज्यामुळे हा मुद्दा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने धमकी दिली होती की जर सरकारने औरंगजेबाची कबर हटवली नाही तर त्याची बाबरीसारखीच अवस्था होईल. 
 

    follow whatsapp