Badlapur News: "ती संस्था RSS आणि भाजपची..." नाना पटोलेंचा भाजपवर खळबळजनक आरोप

मुंबई तक

21 Aug 2024 (अपडेटेड: 21 Aug 2024, 02:44 PM)

Nana Patole On Badlapur Incident : बदलापूरच्या एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Nana Patole On Badlapur Crime

Nana Patole On Badlapur Crime

follow google news

बातम्या हायलाइट

point

महायुतीच्या पदाधिकाऱ्याचा नाना पटोलेंनी घेतला समाचार 

point

बदलापूरच्या घटनेवरून नाना पटोलेंचा महायुती सरकारवर आरोप

point

माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंचा महायुतीवर घणाघात

Nana Patole On Badlapur Incident : बदलापूरच्या एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. बदलापूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बदलापूरच्या शिक्षण संस्थेचा निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणाबाबत मोठं विधान केलं आहे. बदलापूरची शिक्षण संस्था आरएसएस आणि भाजपची असल्याचा आरोप पटोलेंनी महायुती सरकारवर केला आहे. (The incident of sexual harassment of two little girls in a reputed school of Badlapur is seen everywhere. Akshay Shinde, the accused in this case, has been sent to police custody till August 26)

हे वाचलं का?

माध्यमांशी बोलताना नाना पटोले काय म्हणाले? महाराष्ट्रात सथ्या जी काही परिस्थिती आहे, ते पाहता राज्यातील लहान मुलीही आता सुरक्षित नाहीत. बदलापूरची घटना महाराष्ट्रालाच काळीमा लावणारी आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकराने स्वत: प्रयत्न केले आहेत. हे निदर्शनास येत आहे. ती संस्था आरएसएसची आणि भाजपची असल्याने आरएसएस आणि भाजपची बदनामी होऊ नये, अशाप्रकारची काळजी त्याठिकाणी घेतली गेली होती. त्याचा उद्रेक समाज माध्यमांमध्ये निर्माण झाला. 

हे ही वाचा >> Badlapur News: बदलापूरच्या घटनेमागे कुणाचा हात? CM शिंदेंनी कुणावर केले आरोप?

महायुतीच्या पदाधिकाऱ्याचा नाना पटोलेंनी घेतला समाचार 

पटोले पुढे म्हणाले, महायुतीच्या पदाधिकाऱ्याने सकाळच्या महिला पत्रकाराला जे विधान केलं, ते निषेधार्ह आहे. या घटनेचं घेणंदेणं या महायुतीला नाही. सत्ता आणि सत्तेची गरमी हीच भूमिका याठिकाणी पाहायला मिळाली आहे. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज अपमानित आणि काळीमा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय.

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : बदलापूर प्रकरणातील आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

या गंभीर प्रकरणाबाबत आज आम्ही चर्चा केली. येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आपण दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहेत. यामध्ये शाळा, विद्यालये, डॉक्टर्स, दुकानदार आणि शाळेतील मुला मुलींचे पालक, यात सहभागी व्हावेत. महाराष्ट्रातील अकार्यक्षम आणि असंवेधानिक भ्रष्ट सरकारला खरा आरसा दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची जनता करेल, असंही पटोले म्हणाले. 

    follow whatsapp