Narayan Rane : नारायण राणेंवर मोठं संकट, खासदारकीला हायकोर्टात आव्हान

विद्या

13 Jul 2024 (अपडेटेड: 14 Jul 2024, 12:17 AM)

Narayan Rane News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेतून विनायक राऊत यांनी राणेंवरल अनेक गंभीर आरोप केले आहेत.

narayan rane candidancy challenge high court wins by threatning voters thackeray group vinayak raut

भापज नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका

point

विनायक राऊत यांनी राणेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

point

लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती

Narayan Rane News : कोकणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भापज नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते विनायत राऊत यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नारायण राणे यांनी मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून विजय मिळवला आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.  (narayan rane candidancy challenge high court wins by threatning voters thackeray group vinayak raut) 

हे वाचलं का?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेतून विनायक राऊत यांनी राणेंवरल अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र कारवाई झाली नाही म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 

याचिकेत काय? 

निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. तसेच नारायण राणे यांनी मते विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

हे ही वाचा : Maharashtra MLC Election : "ऐनवेळी असे का केले?", ठाकरेंना कपिल पाटलांचा संतप्त सवाल

 नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही.आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

 प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याआधारे चौकशी करावी. नारायण राणेंची खासदारकी रद्द करावी. याचिकेत नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.7 मे रोजी झालेली लोकसभा निवडणूक आणि 4 जून रोजीचा निकाल अवैध आहे, असे घोषीत करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

राणे यांनी मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

    follow whatsapp