‘नारायण राणेंना तर बाईने पाडलं.. बाईने..’, अजित पवारांची बोचरी टीका

मुंबई तक

24 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 10:25 PM)

Ajit Pawar Criticized Narayan Rane: चिंचवड: ‘नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले की नाही. राणे साहेब तर दोनदा पडले. मुंबईत तर बाईने पाडलं.. बाईने..’ अशा बोचऱ्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली आहे. जे शिवसेना (Shiv Sena) फोडतात त्यांना जनता माफ करत नाही. […]

Mumbaitak
follow google news

Ajit Pawar Criticized Narayan Rane: चिंचवड: ‘नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले की नाही. राणे साहेब तर दोनदा पडले. मुंबईत तर बाईने पाडलं.. बाईने..’ अशा बोचऱ्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली आहे. जे शिवसेना (Shiv Sena) फोडतात त्यांना जनता माफ करत नाही. असं म्हणत अजित पवारांनी त्यांच्याच पक्षात असणाऱ्या छगन भुजबळांचं उदाहरण दिलं. त्याचवेळी त्यांनी नारायण राणेंवर अगदी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. (narayan rane was defeated in the election by a woman ajit pawars criticism)

हे वाचलं का?

अजित पवारांची राणेंवर बोचऱ्या शब्दात केली टीका

‘मी असं केलं.. मी तसं केलं.. अरे तुम्ही काय केलंत.. सुरत गेलात.. गुवाहटीला गेलात तिथून गोव्याला गेलात आणि नंतर मुंबईला आले. काय केलं.. हा काय झाडं.. काय डोंगार.. काय हाटेल हे असलं.. हे असलं बघायला गेले..’

‘आता ५० खोके एकदम ओके.. असं आम्ही म्हणतो का.. असं जनता म्हणते. हे लोकांना नाही आवडत. मागे ज्या-ज्या वेळेस शिवसेनेला लोकांनी फोडण्याचा प्रयत्न केला किंबहुना आमच्याबरोबर असणाऱ्या भुजबळ साहेबांनी पण १९ लोकांना फोडलं. भुजबळ साहेबांसहीत सर्व लोकांना पराभूत करण्याचं काम जनतेनं केलं. केलं की नाही?.. नंतर साहेबांनी भुजबळ साहेबांना दिल्लीला नेलं, दिल्लीच्या राजकारणात.. नंतर मग विधानपरिषदेचं आमदार केलं.’

‘नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले की नाही. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा तिथे पडले कोकणात आणि एकदा मुंबईत… बांद्रा का कुठे तरी उभे होते. तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं. बाईने पाडलं.. बाईने.. ही त्यांची प्रत्येकाची काय परिस्थिती आहे आणि काय टेंभा मिरवतात ही लोकं. यांचं काही खरं नाही. यांचा काही विचार करू नका.’ अशी थेट टीका अजित पवारांनी केली होती.

‘टिल्ल्या लोकांनी असलं काही…’, अजित पवारांकडून नितेश राणेंची हेटाळणी

26 फेब्रुवारीला महाराष्ट्रातीलही दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदासंघात पोटनिवडणूक पार पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन जागांवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या दोन जागांवर 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी या दोन जागांवरीलही निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

पोटनिवडणूक जाहीर झालेल्या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते. यात पुणे शहरातील ‘कसबा पेठ’ मतदारसंघातून मुक्ता टिळक या आमदार होत्या. मात्र 22 डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं. तर चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप आमदार होते. पण त्यांचंही 3 जानेवारी रोजी निधन झालं आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

‘लघुशंकेनं धरणाची…’, ‘टिल्ल्या लोक’वरून अजित पवारांवर राणेंचा पलटवार

या दोन्ही जागांसाठी महाविकास आघाडीने भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या हेतूने आपले उमेदवार उतरवले आहेत. कसबा पेठ मतदारासंघात काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे. तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुका या अतिशय चुरशीच्या झाल्या आहेत.

    follow whatsapp