पुण्यात अख्खा ट्रक खड्ड्यात.. शिंदे-फडणवीसांवर पुणेरी टीका, पवार गटाने डिवचलं!

मुंबई तक

• 05:31 PM • 21 Sep 2024

NCP Sharad Pawar Group Tweet Viral : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आलाय. पुण्यातील समाधान चौकात अचानक रस्ता खचल्याने आख्खा ट्रकच नाल्यात अडकल्याची घटना नुकतीच घडली.

NCP Tweet On CM Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis

NCP Sharad Pawar Group On Pune Truck Accident

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे महानगरपालिकेचा ट्रक खड्ड्यात पडल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारला घेरलं

point

NCP शरद पवार गटाने CM एकनाथ शिंदे, अजित पवार-फडणवीसांची उडवली खिल्ली

point

शरद पवार गटाने महायुतीच्या नेत्यांना धरलं धारेवर, ट्वीट होतंय व्हायरल

NCP Sharad Pawar Group Tweet Viral : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आलाय. पुण्यातील समाधान चौकात अचानक रस्ता खचल्याने आख्खा ट्रकच नाल्यात अडकल्याची घटना नुकतीच घडली. पुणे महानगरपालिकेचा ट्रक खड्ड्यात पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या घटनेमुळं पुणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची झालेली दुरावस्था समोर आली आहे.

हे वाचलं का?

ट्रकचा व्हिडीओ व्हायरल होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांसह जनतेनं सरकारला धारेवर धरलं आहे. निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यांमुळे अशाप्रकारचे भयानक अपघात होतात, याला सरकारच जबाबदार असल्याचा सूर विरोधकांनी आवळला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शदरचंद्र पवार गटाने एक्सवर एक भन्नाट पोस्ट व्हायरल केली आहे. या शरद पवार गटाने या पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. 

या पोस्टच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवण्यात आली. शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि भाजपचं महायुतीचं सरकार आहे. परंतु, हे सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. कारण खड्ड्यात पडलेले ट्रकचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर मिम्स तयार करण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> Race 4: 'या' दिवशी होणार रिलीज, हायवेवर निघणार धूर! सलमान नव्हे, सैफ अली खानचा रंगणार थरार

या तिन्ही मंत्र्यांचे फोटो ट्रकच्या बोनेटवर लावून चोथ्या फ्रेममध्ये भन्नाट कॅप्शन देण्यात आलं आहे. चौथा वाटेकरी कोण? चौथी भागिदारी कुणाची? असा सवाल या चौथ्या फोटोत उपस्थित करण्यात आला आहे. शरद पवार गटाने ट्वीट करत म्हटलंय की, 'त धसलेल्या खड्ड्यातून प्रकटलेले भ्रष्ट कारभारी तुम्ही पाहिलेत... आता तुम्हीच शोधा ह्या तिघांचा म्होरक्या कोण? तो चौथा अदृश्य कोण?' असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

पुण्यातील समाधान चौकात अचानक रस्ता खचल्याने आख्खा ट्रकच नाल्यात गेल्याची घटना काल शुक्रवारी घडली. पुण्यातील सीटी पोस्टजवळ अचानक रस्ता खचला आणि संपूर्ण ट्रकच खड्ड्यात गेला. या अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ज्या ठिकाणी रस्ता खचून खड्डा पडला, त्या ठिकाणी मोठा नाला असल्याने हा ट्रक थेट खड्डात पडला. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेचा ट्रक मटेरिअल घेऊन समाधान चौकात आला होता. त्याठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं. हा ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेव्हर ब्लॉक खचले आणि अख्खा ट्रक खाली गेला.  या ट्रकमधील चालक आणि इतर लोक सुस्थितीत आहेत की नाहीत, याबात अग्निशमन दलाकडून तपासणी करण्यात येत आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचीही माहिती घेतली जात आहे. 

    follow whatsapp