अमित शाह पुण्यात आल्यानंतर अजित पवारांनी काय केलं कौतुक?

प्रशांत गोमाणे

06 Aug 2023 (अपडेटेड: 06 Aug 2023, 08:39 AM)

पंतप्रधान मोदींचे सहकारीता ते समृद्धी हे लक्ष्य ठेऊन अमित शाहांच्या नेतृत्वाखाली सर्वोतपरी प्रयत्न सुरु असल्याचे कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अमित शाहा यांच्या या प्रयत्नांना आमची संपूर्ण साथ असेल, असा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला.

ncp ajit pawar praised amit shah on pimpari chinchwad inauguration ceremony of portal of cooperative department

ncp ajit pawar praised amit shah on pimpari chinchwad inauguration ceremony of portal of cooperative department

follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पहिल्यांदाच केंद्रीय स्तरावर सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि देशाच्या पहिल्या सहकार मंत्री पदाचे नेतृत्व अमित शाहा यांनी सांभाळले. पंतप्रधान मोदींचे सहकारीता ते समृद्धी हे लक्ष्य ठेऊन अमित शाहांच्या नेतृत्वाखाली सर्वोतपरी प्रयत्न सुरु असल्याचे कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अमित शाहा यांच्या या प्रयत्नांना आमची संपूर्ण साथ असेल, असा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित सहकार विभागाच्या पोर्टलच्या लोकार्पण सोहळ्यात अजित पवार बोलत होते. (ncp ajit pawar praised amit shah on pimpari chinchwad inauguration ceremony of portal of cooperative department)

हे वाचलं का?

पिंपरी चिंचवडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते सहकार विभागाच्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाहांचे तोंडभरून कौतुक केले आहे. अमित शाहांच्या नेतृत्वात देशाच्या सहकार क्षेत्रात नवीन बदलाव होत आहेत. हे बदल आम्ही सर्व पाहतोय. हे बदलाव सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना, संस्थांना, पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना विचारात घेऊन सहमतीने होत आहेत. देशाच्या व्यापक हिताला समोर ठेवून, हे सर्व केले जात असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Nitin Gadkari : ‘…तर तुमच्यावरच बुलडोजर चालवणार’, गडकरींनी कुणाला दिला दम?

देशाच्या सहकारी क्षेत्रातला इतिहास साधारण 120 वर्षांचा आहे. या 100 ते 120 वर्षात सहकार हे एकमेव असे क्षेत्र आहे, जे प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले आहे. शहर आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतीक प्रगती आणण्यासाठी सहकार क्षेत्राने मोलाचे योगदान दिले असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच अजित पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्यालयात पहिल्यांदा केंद्रीय स्तरावर सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय़ झाला आणि देशाच्या पहिल्या सहकार मंत्रीच्या ठिकाणी अमित शहा यांनी नेतृत्व सांभाळले याचा मला आनंद असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांचे सहकारीता ते समृद्धी हे लक्ष्य प्राप्त करण्याचे हेतू असून अमित शाहांच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आमची संपूर्ण साथ असेल,असा विश्वास देखील अजित पवार यांनी यानिमित्त व्यक्त केला.

कार्यक्रमात एकच हशा पिकला

अमित शाह गुजरातमधून येतात, पण त्यांचे अधिक प्रेम महाराष्ट्रावर आहे असे विधान अजित पवार यांनी करताच कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला. पण यामागचे कारण तरी ऐका असे अजित पवार म्हणताच एकच हषा पिकला. यामागचे कारण म्हणजे ते महाराष्ट्राचे जावई आहेत. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण प्रत्येक जावयाचे त्याच्या सासरवाडीवर थोड प्रेम असतंय असतं, असे अजित पवार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही राज्य कधी एक होते. सहकारी क्षेत्रातील दोन्ही राज्यांचा इतिहास किंवा वर्तमान गौरवशाली राहिला आहे, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ‘त्यांनी घडवले ते प्रदीप कुरुलकर’, राऊतांनी RSS, फडणवीसांना काय सुनावलं?

अमित शाहांच्या नेतृत्वाखाली आज मल्टीस्टेट सहकारी संस्थांचे समन्वय,संचालन किंवा नियंत्रणात सुलभता आणण्याच्या हेतूने महत्वपूर्ण वेब पोर्टलचं लोकार्पण होत आहे. शा अनेक निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशात कार्यरत सहकारी संस्था उत्साह आणि सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. सहकार क्षेत्राच्या समस्या दुर होण्यास मदत होईल, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. देशाचे सहकार क्षेत्र आपल्या लक्षाच्या दिशेने नवीन विश्वासाने पुढे जातोय. सहकाराच्या माध्यमातून सर्व वर्गाच्या, सामाजिक आणि आर्थिक विकासात चांगला बदलाव येईल अशी मला अपेक्षा असल्याचा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला.

    follow whatsapp