Ncp Crisis, Election Commission Hearing: खरी राष्ट्रवादी कुणाची? या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर पहिली सुनावणी शुक्रवारी (६ ऑक्टोबर) पार पडली. यावेळी अजित पवार गटाने युक्तिवाद केला. अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शरद पवार गटाला युक्तिवादासाठी वेळ दिली जाणार आहे. पण, अजित पवार गटाकडून करण्यात येणार दावे हाणून पाडण्यासाठी शरद पवार गटाची स्ट्रॅटजी ठरली आहे. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी याबद्दल सांगितलं.
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी काही बाबी मांडल्या. यात अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या काही दाव्यांबद्दल त्यांनी माहिती दिली.
शरद पवार गटाचे वकील काय बोलले?
सिंघवी म्हणाले, “दोन तास सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या सुनावणीत दोन गोष्टी मांडण्यात आल्या. आम्ही आयोगाला सांगितलं की, तुम्ही आमची बाजू ऐकून न घेता… कुठला वाद आहे का? कुठली फूट आहे का? याबद्दल निर्णय घेऊन टाकला, तर ते चुकीचं असेल. आमची बाजू ऐकून घ्या. त्यानंतर निकाल द्यावा.”
“दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुनावणी दरम्यान नैसर्गिक न्यायाचा मुद्दाही उपस्थित केला. आम्ही उत्तरदायी आहोत, त्यामुळे आम्ही विरोध केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं की आमचा विरोध प्रथमदर्शनी मान्य केला जाणार नाही. पण, आयोगाने आम्हाला आश्वस्त केलं आहे की, दुसऱ्या गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आम्हाला सविस्तर ऐकून घेतलं जाईल”, असं सिंघवी यांनी सांगितलं.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांच्या पत्रात पवारांनी काढल्या चुका, वाचा 2019 ची Inside Story
“कोणताही व्यक्ती चुकीचे कागदपत्रे, खोटी कागदपत्रे आयोगात दाखल करून पक्षात वाद आहे, फूट आहे असं म्हणू शकत नाही. एक काल्पनिक फूट दाखवून निवडणूक आयोगात घुसले आणि दोन पक्ष दाखवत आहे. आम्ही त्या काल्पनिक फूटीबद्दल अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. आम्ही अजून युक्तिवाद केलेला नाही. त्यावेळी आम्ही निवडणूक आयोगासमोर सर्व कागदपत्रे विस्तृतपणे मांडू. अनेक अशी कागदपत्रे आहेत, ज्यात काही लोकांचे निधन झालेले आहे. त्यांनाही पार्टीचे सदस्य असल्याचे दाखवले गेले आहे”, असा मोठा आरोप शरद पवार गटाचे वकील सिंघवी यांनी केला आहे.
हेही वाचा >> “अजित पवार ज्यांच्या उरावर…”, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या वर्मावर ‘बाण’
“अनेक असे कागदपत्रे आहेत, ज्याच्यावर स्वाक्षऱ्या वेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. प्रत्यक्षात ती व्यक्ती राहते दुसऱ्या ठिकाणी. अनेक असे दस्ताऐवज आहे, ज्यात ते लोक म्हणताहेत की, मी स्वाक्षरीच केली नाही. यात काही कागदपत्रे अशी आहेत की, दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीलाही स्वतःच्या गटात असल्याचे दाखवण्यात आले आहे”, असा दावाही सिंघवींनी केलाय.
“यातून हेच दिसत आहे की ही एक काल्पनिक फूट तयार करण्यात आली आहे. पक्षाचा ढाचा जो आहे, त्यापासून याचिकाकर्ते दूर पळत आहे. त्यांनी दहा वेळा असा युक्तिवाद केला की, जो पक्षाची रचना आहे, ते आम्हाला बघायचं नाही. आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारावर पक्ष ठरवण्याचा आधार सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाईंच्या प्रकरणात नाकारला आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने नवीनच मुद्दा मांडला आहे, त्याचं आम्ही खंडण करू. त्यांनी बेकायदेशीर चाचणी पुढे आणलीये. त्यांचं म्हणणं आहे की आमदार आणि खासदारांची संख्या मोजा. उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की, ज्या प्रकरणात आमदार आणि खासदारांविरोधात अपात्रता प्रकरण सुरू आहे, त्यात तुम्ही आमदार खासदारांची संख्या मोजू शकत नाही”, असं सिंघवी यांनी सांगितलं.
हेही वाचा >> NCP: अजित पवार गटानं ‘या’ चार आमदारांची नाव का वगळली?
“त्या गटाने असं म्हटलंय की, त्या आमदार आणि खासदारांना किती मतं मिळाली आहेत, ते मोजा. आजपर्यंत कायद्यात आम्ही अशा कसोट्या बघितल्या नाहीत. हे निराधार आहे. ते घाबरले आहेत, याचं हे द्योतक आहे. आम्ही या सगळ्यांना उत्तर देऊ. आज मूळ राष्ट्रवादी जी आहे, ती शरद पवारांची आहे”, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT