Supriya Sule Press Conference : "मी उद्या मस्साजोग आणि परळीला पण जाणार आहे. माझं बजरंग आप्पा सोनावणे यांच्याशी बोलणं झालं आहे. बीड जिल्ह्यात तिथे जे खून झालेले आहेत, त्यावर गेले दोन महिने आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण जे सत्य आहे ते कुठेच बाहेर येताना दिसत नाही. मला अस्वस्थता वाटते की, महादेव मुंडे आणि संतोष देशमुख कुटुंबातील लोक न्याय मागत आहेत. दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही. त्यामुळे मी उद्या परळीलाही जाणार आहे. दोन्ही ठिकाणी जाऊन माहिती घेणार आहे. जवळपास 70 दिवस व्हायला आले, मग पाचवा खुनी कुठे आहे? चौकशी कसली सुरु आहे? हे सर्व पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे. जेव्हा मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते, तेव्हा पीएमएलएचा कायदा केला, त्यात खंडणी हा गुन्हा आहे आणि त्याला ईडी आणि सीबीआय लागतं. मग या सर्व प्रक्रियेत ईडी आणि सीबीआयचा सहभाग का दिसला नाही? तिथे काय सुरु आहे, याची आम्हाला माहिती का मिळत नाहीय?", असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत म्हणाल्या, "देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. दोन्ही घरात जो खून झालेला आहे, त्या कुटुंबातील महिलांना आणि माऊलींना न्याय हा मिळालाच पाहिजे.अंजली दमानीया आणि सुरेश धसांनी जे आरोप केले आहेत, त्याची कागदपत्रेही सरकारला दिली आहेत. अंजली दमानीया आणि सुरेश धस पुण्याचे आणि बीडचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही भेटले आहेत. त्यांनी सर्व कागदपत्रे डीसीएम आणि सीएम या दोघांनाही दाखवलेले आहेत. ज्या महाराष्ट्रात खंडणी, खून झाला, पवार साहेबांनी महिलांसाठी या महाराष्ट्रात धोरण आणलं. या छत्रपतींच्या आणि शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिलेला आईच्या जागेवर ठेवलं जातं. अशा महिलांची कौंटुबिक हिंसाचाराची प्रकरणही समोर येतात. अशी भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची पारदर्शकपणे चर्चा झालीच पाहजे".
हे ही वाचा >> Sanjay Raut : 'वाल्किम कराडचा बॉस धनंजय मुंडे...', धस-मुंडे भेटीनंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
"पारदर्शकपणे सरकारला खरं कळलं पाहिजे आणि या सरकारने नैतिकता दाखवली पाहिजे. ही आमची आग्रहाची भूमिका आहे. उपमुख्यमंत्र्यांचं (अजित पवार) यांची प्रतिक्रिया मी काल पाहिली. त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते, तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता, असा त्यांनी उल्लेख केला. ही गोष्ट खरी आहे. तेव्हा पक्ष एक होता. छगन भुजबळ, अशोक चव्हाण, आर आर पाटील यांनीही नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. अजित पवारांनीही नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. तोच आदर्श ठेऊन बाकीच्या लोकांनी वागावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. चौकशी पारदर्शकपणे व्हावी", असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे ही वाचा >>सुरेश धसांचा नवा लेटर बॉम्ब... 'त्या' भेटीनंतर धनंजय मुंडे पुन्हा टार्गेटवर?
ADVERTISEMENT
