पंकजा मुंडेंसाठी सुप्रिया सुळे सरसावल्या; अमित शाहांवर ‘बाण’, काय म्हणाल्या?

भागवत हिरेकर

26 Sep 2023 (अपडेटेड: 26 Sep 2023, 07:27 AM)

भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाली आहे. या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी थेट अमित शाहांवर टीका केली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

Assets worth Rs 19 crore of Vaidyanath Cooperative Sugar Factory have been seized. Pankaja Munde is the chairman of the factory.

Assets worth Rs 19 crore of Vaidyanath Cooperative Sugar Factory have been seized. Pankaja Munde is the chairman of the factory.

follow google news

Pankaja Munde Supriya Sule Tweet : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ज्या कारखान्याच्या चेअरमन आहे, त्याच कारखान्याची तब्बल 19 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीये. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्याच्या कारखान्यावर झालेली ही कारवाईने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. पण, भुवया उंचावल्या गेल्या, त्या सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे. पंकजा मुंडेंवर होत असलेल्या अन्यायाची बाब थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडेच मांडलीये.

हे वाचलं का?

पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केलीये. जीएसटी विभागाने तब्बल 19 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलीये. या संपत्तीचा लिलाव करून रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती आहे. पण, सत्ताधारी पक्षातील नेत्याच्याच कारखान्यावरील कारवाईने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

सुप्रिया सुळेंची थेट अमित शाहांकडेच मांडला मुद्दा

पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांकडेच मांडला. सुप्रिया सुळे यांनी एक्स वर एक ट्विट केलंय. हे ट्विट पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृह तथा सहकारी मंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे.

हेही वाचा >> ‘या’ निकषावर ठरणार राष्ट्रवादी कुणाची? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान

सुप्रिया सुळे म्हणतात, “जुन्या हिंदी सिनेमातील ‘अपनों पे सितम,गैरों पे करम’ या गाण्याची आठवण यावी, अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.”

हेही वाचा >> वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर जीएसटीची कारवाई, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. परंतु यातून पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आले. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याचा समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंकजा मुंडे यांची भाजपत गळचेपी सुरू असल्याचं थेटपणे म्हटलंय.

कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न

“नमूद करण्याची बाब म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजाताईंच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >> मोदी सरकारला इंडिया नाव बदलण्यासाठी काय करावं लागेल?

एकनाथ खडसेंचीही भाजपवर टीका

पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या एकनाथ खडसेंनी यावरून भाजपवर टीकास्त्र डागलंय. “पंकजा मुंडे यांनी काढलेली शिवशक्ती परिक्रमा यात्रा सरकारच्या काही लोकांना आवडली नसावी आणि आकस बुद्धीने त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई केली असावी”, असं एकनाथ खडसे म्हणालेत.

    follow whatsapp