Maharashtra Politics News Latest: मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज (2 जुलै) मोठा राजकीय भूकंप झाला. कोणालाही कुणकुण लागू न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट शिंदे-फडणवीसांसोबत (Shinde-Fadnavis Govt) सत्तेत जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास अजित पवारांसह 9 जणांचा झटपट शपथविधी देखील उरकण्यात आला. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर 9 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली. दरम्यान, यावेळी राजभवनात राष्ट्रवादीच्या कोणकोणत्या आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (ncp mla raj bhavan ajit pawar oath deputy chief minister supporting ajitdada sharad pawar latest news in maharashtra politics)
ADVERTISEMENT
अजित पवार हे बंड करून सरकारमध्ये सामील होतील अशा चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अखेर या सगळ्या चर्चांना अजित पवारांनी आता पूर्णविराम दिला आहे. राजभवनात अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर, राष्ट्रवादीच्याच 9 नेत्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. पाहा अजित पवारांच्या या शपथविधीला राष्ट्रवादीचे कोणकोणते आमदार आणि खासदार उपस्थित होते.
हे ही वाचा >> Maharashtra Politics: कोण अजितदादांसोबत अन् कोण पवारांसोबत? NCP आमदारांची संपूर्ण यादी
कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
- दिलीप वळसे पाटील, कॅबिनेट मंत्री
- अदिती तटकरे, कॅबिनेट मंत्री
- हसन मुश्रीफ, कॅबिनेट मंत्री
- छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री
- धनंजय मुंडे, कॅबिनेट मंत्री
- धर्मराव आत्राम, कॅबिनेट मंत्री
- संजय बनसोडे, कॅबिनेट मंत्री
- अनिल पाटील, कॅबिनेट मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणकोणते आमदार राजभवनावर होते हजर?
- दौलत दरोडा, आमदार
- मकरंद पाटील, आमदार
- अतुल बेनेके, आमदार
- सुनिल टिंगरे, आमदार
- अमोल मिटकरी, आमदार
- किरण लहमाटे, आमदार
- निलेश लंके, आमदार
- शेखर निकम, आमदार
- निलय नाईक, आमदार
- अशोक पवार, आमदार
- अनिल पाटील, आमदार
- सरोज अहिरे, आमदार
- रामराजे निंबाळकर, आमदार
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणकोणते खासदार राजभवनावर होते हजर?
- अमोल कोल्हे, खासदार
- सुनील तटकरे, खासदार
- प्रफुल पटेल, खासदार
हे आमदार आणि खासदार अजित पवारांच्या शपथविधीला हजर होते. मात्र, शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असा दावा केला आहे की, जे आमदार तिथे हजर होते. त्यांचा या सगळ्याला पाठिंबा नाही. त्यापैकी अनेक आमदारांनी असं सांगितलं की, अजित पवारांच्या या भूमिकेला त्यांचा पाठिंबा नाही.
हे ही वाचा >> “शिवसेनेच्या 40 आमदारांना संधी”, बंड अजित पवारांचं, पण जयंत पाटलांचा शिंदेंना सल्ला
यामुळे जे आमदार आणि खासदार हे शपथविधीला हजर होते त्यापैकी किती जणांचा अजित पवारांना पाठिंबा आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT