Jayant Patil Latest news : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये अमित शाह यांची भेट घेतली, या वृत्तानंतर राजकारणात खळबळ उडाली. जयंत पाटील शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत, अशी चर्चाही सुरू झाली. पण, पाटलांनी लगेच समोर येत खुलासा केला.
ADVERTISEMENT
झालं असं की पावसाळी अधिवेशन झालं. त्यानंतर एका चर्चेने डोकं वर काढलं. चर्चा अशी सुरू झाली की, पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अजित पवारांसोबत जाणार. नंतर असे वृत्त समोर आलं की जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार.
वाचा >> ‘हीच जागा योग्य होती, पण…’; अमित शाहांचं विधान ऐकून अजित पवारांनी जोडले हात
या सगळ्यात केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे पुण्यात आले. त्यानंतर या चर्चेला जास्तच हवा मिळाली. कारण, जयंत पाटील यांनी जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये अमित शाहांची भेट घेतल्याचं म्हटलं गेलं. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनीच ही भेट घडवून आणि देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना फोन करून बोलवून घेतलं. जयंत पाटील हे आमदार सुमन पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत जाणार असल्याचं बोललं गेलं.
अमित शाहांना भेटल्याच्या चर्चेवर जयंत पाटील काय बोलले?
अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, “माझ्याविषयी गैरसमज पसरवू नका. मी शाहांना भेटलो याचे काही पुरावे आहेत का? मी संध्याकाळी आणि आज सकाळी पवारसाहेबांसोबत होतो. रात्री दीड वाजेपर्यंत अनिल देशमुख, राजेश टोपेंसोबत बैठकीत होतो. माझ्यासाठी मनोरंजन आहे.”
मी दररोज पवारसाहेबांना भेटतोय -जयंत पाटील
“मी माझ्याच घरी आहे. तुम्हीच बातम्या करतायत, तुम्हीच खुलासे करा. आमच्या पक्षवाढीसाठी बैठका सुरू आहेत. माझ्यावर कुणाचा दबाव नाही. मला कुणी सांगितलेले नाही किंवा मी असं काही बोललेलो नाही. कुणाशीच चर्चा झालेली नाही. मी दररोज पवारसाहेबांना भेटतोय. माझी रोज करमणूक सुरू आहे. त्यात काल दुपारी भर पडली. आज सुरू आहे. महाराष्ट्रात माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी आहे. हे योग्य नाही”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.
वाचा >> ‘…तर तुमच्यावरच बुलडोजर चालवणार’, गडकरींनी कुणाला दिला दम?
“मी आता पार्टी ऑफिसला चाललोय. मी कुणालाच भेटलेलो नाही. पवारांसोबत राहणार शेवटपर्यंत? हेा काय विचारायचा प्रश्न आहे. मी साहेबांसोबतच आहे. गैरसमज पसरवू नका. बार-बार मत गलतफहमी मत करो. घरी बसून बातम्या पसरवू नका. महाराष्ट्रातील जनता मला ओळखून आहे”, असे जयंत पाटील सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना म्हणाले.
ADVERTISEMENT