Sharad Pawar: पुणे: 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचं नाव न घेता बरेच टोले लगावले आहेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावे तसे निर्णय घेतले जात आहेत.’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) टीकेची झोड उठवली. (ncp president sharad pawar strongly criticized pm narendra modi government on demonetisation investigative agency or all other issues)
ADVERTISEMENT
‘2000 रुपयांच्या बाबतीत काही तक्रारी आल्या आहेत. म्हणजे यासंबंधीचा जो निर्णय घेतलाय… एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावेत तशा प्रकारचे निर्णय हल्ली घेतले जातात. मागे अशाप्रकारचा एक निर्णय घेतला.. खूप लोकांचं नुकसान झालं.’ अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.
पाहा पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार काय म्हणाले:
‘100 कोटीचे आरोप झाले.. लोकांना धक्का बसला..’
‘ज्या तपास यंत्रणा आहेत त्याचा गैरवापर कसा केला जातो याचं उत्तम उदाहरण हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं आहे. आमच्याकडे यादी आहे की, राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या 10 लोकांना चौकशीसाठी बोलावलं गेलं. काही लोकांवर अॅक्शनही घेतली. अनिल देशमुख… यांना जवळपास 13-14 महिने तुरुंगात ठेवलं.’
‘त्यांच्यावर सुरुवातीला केस होती की, त्यांनी शैक्षणिक संस्थेला 100 कोटी घेतले असा आरोप होता. चौकशीच्या नंतर जे आरोपपत्र दाखल केलं त्यामध्ये ती 100 कोटीची रक्कम दीड कोटींवर आली. याचा अर्थ किती अतिरंजित असे आरोप केले जातात. लोकांच्या समोर पहिल्यांदा जे आरोप गेले ते 100 कोटीचे झाले. लोकांना धक्का बसला.. काय चाललंय हे.. या मंत्र्याकडे 100 कोटी वैगरे-वैगरे… म्हणजे त्यांच्या बदनामीचं काम केलं. आता ते सांगतायेत की, 1.50 कोटीची रक्कम..’
‘ही रक्कम पण कसली आहे तर त्यांच्या शैक्षणिक संस्थेला कोणी तरी देणगी दिली आहे. ती रक्कम चेकने आली आहे. ती रक्कम शैक्षणिक संस्थेच्या खात्यात आजही आहे. ती खर्चही झालेली नाही. अशी स्थिती असताना 100 कोटीचा उल्लेख आणि 13 महिन्यांचा तुरुंगवास याचा अर्थ सध्याचं हे सरकार सत्तेचा गैरवापर कसा करतं याचं हे उत्तम उदाहरण आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी विरोधकांविरोधात ज्या कारवाया सुरू आहेत त्यावर टीका केली.
‘वाटेल ती किंमत मोजू, पण आमचा मार्ग सोडणार नाही’
‘राष्ट्रवादीच्या 9-10 लोकांना त्रास देण्यात आला आहे. काही अपेक्षा राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अपेक्षाची पूर्तता करण्याची आम्हा लोकांची तयारी नाही. काय असेल ती किंमत मोजू.. पण आमचा रस्ता आम्ही सोडणार नाही. हे सूत्र त्यांना पसंत पडत नाही. त्यामुळे या यातना सहन करायला मिळतात. पण त्याची चिंता आम्हा कोणाला नाही.’
‘परमबीर सिंह यांच्यावर केसेस किती आहेत याबाबत महाराष्ट्र सरकारनेच माहिती काढावी. ठाण्यात असताना किती केसेस झाल्या.. म्हणजे चुकीचं काम करणाऱ्यांना संरक्षण.. हे सूत्र आताच्या सरकारचं दिसतंय..’ असं पवार यावेळी म्हणाले.
‘नवाब मलिकांना त्रास दिलाच, पण…’
‘नवाब मलिकांना त्रास दिलाच.. पण सातत्याने ते जे काही चुकीच्या गोष्टीच्या संबंधीची भूमिका मीडियासमोर मांडत होते त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पण किंमत मोजत असताना ज्यांच्या संदर्भाती भूमिका त्यांनी घेतली आज त्या लोकांबद्दल काही कारवाई करण्याचा निर्णय देशातील मोठ्या संस्थेला.. CBI ला घ्यावा लागला. याचा अर्थ नवाब मलिक यांची भूमिका ही किती सत्यावर आधारित होती हे स्पष्ट झालं आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी मलिकांची बाजू योग्य असल्याचं म्हटलं आहे.
‘एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावेत…’
‘2000 रुपयांच्या बाबतीत काही तक्रारी आल्या आहेत. म्हणजे यासंबंधीचा जो निर्णय घेतलाय… एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावेत तशा प्रकारचे निर्णय हल्ली घेतले जातात. मागे अशाप्रकारचा एक निर्णय घेतला.. खूप लोकांचं नुकसान झालं. पुणे जिल्ह्याचं उदाहरण सांगायचं झालं तर.. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेकडे त्या काळात कॅश होती. त्यातील आकडा मला लक्षात नाही.. पण काही कोटी रक्कम ही बदलून द्यायची जबाबदारी असताना ती बदलून दिली नाही. पुणे जिल्हा बँकेचं त्यात आर्थिक नुकसान झालं. असंच कोल्हापूरच्या बँकेचंही झालं.’
हे ही वाचा >> BJP: ‘तुमची पदं भाजपमुळे हे विसरू नका’, मंत्री उदय सामंत-दादा भुसेंना भाजप सहमुख्य प्रवक्त्याने सुनावलं
‘म्हणजे निर्णय घ्यायचे.. निर्णय घेतल्यानंतर ज्यांची गुंतवणूक आहे त्यांना बदल करून देण्याची जबाबदारी घ्यायची नाही. पण आम्ही काही तरी वेगळं करतो आहोत हे दाखवायचं.’
‘सुरुवातीच्या काळात सांगण्यात आलं की, ही नोट इतक्या-इतक्या रुपयांची जी आजपासून बंद होईल आणि देशात चमत्कार होईल. देशात चमत्कार एवढाच झाला की, अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. अनेक कुटुंब आणि व्यवसायिक हे उद्ध्वस्त झाले. ते चमत्कार केल्यानंतर पुरेसा नाही म्हणून आता हा दुसरा चमत्कार आता केलेला आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार टोलेबाजी केली…
‘जागा वाटपाबाबत अजिबात…’
‘जागा वाटपाबाबत अजिबात चर्चा झाली नाही. माझ्याच घरी बैठक झाली. त्यात असं ठरलं ठरलं की, महाविकास आघाडीत पक्षाने प्रत्येकी दोन-दोन नेते द्यावेत आणि या लोकांनी बसून विचार करावा. जर काही अडचण आली तर मी आहे, उद्धव ठाकरे आहेत आणि काँग्रेसच्या वतीने सोनियाजी किंवा खर्गे असतील. आम्ही लोकांनी बसून त्यातून मार्ग काढावा अशी सूचना आली आहे. निर्णय नाही..’
‘कुठल्याही परिस्थितीत कोणी किती जागा लढवायच्या याबाबत काहीही चर्चा झालेली नाही. मी गेले दोन दिवस मीडियात जे बघतोय त्यात तथ्य नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एका विचाराने काम करत आहेत.’ असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे.
शरद पवारांकडून राहुल गांधींच कौतुक…
‘राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा त्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचं एक उदाहरण आपल्याला कर्नाटकात पाहायला मिळालं. त्यामुळे तुम्ही असेच राहुल गांधींसंबंधी बोलत राहा लोक मात्र त्यांना त्यांच्यासोबतच्या लोकांना शक्ती देतील याची मला खात्री आहे.’
हे ही वाचा >> James Marape : PM मोदींच्या पाया पडणारे पापुआचे PM अत्यंत चालाख, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमच करतात!
‘राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा त्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचं एक उदाहरण आपल्याला कर्नाटकात पाहायला मिळालं. त्यामुळे तुम्ही असेच राहुल गांधींसंबंधी बोलत राहा लोक मात्र त्यांना त्यांच्यासोबतच्या लोकांना शक्ती देतील याची मला खात्री आहे.’ असं म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींचं एक प्रकारे कौतुकच केलं आहे.
‘मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अजिबात नाही’
‘पहिल्यांदा तुम्हाला सत्य सांगतो.. तुम्ही काही विचारा.. पण या वयाप्रमाणे हा शब्द परत घ्या..’
‘मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारं नेतृत्व हवंय. आम्ही सगळे एकत्र बसू.. जनतेने आम्हाला साथ दिली तर त्यातून आम्ही ठरवू. माझ्यासारख्यांची जबाबदारी आहे की, असे जे काही नेते असतील त्यांना पूर्ण साथ देणं.. शक्ती देणं.. ते मागतील तिथं मदत देणं.’ असं पवार यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT