Latest News Maharashtra Politics: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते पदावरुन मुक्त करा आणि पक्षात एखादं पद द्या अशी मागणी करत खळबळ उडवून दिली. मात्र, त्यानंतर भाषणाला आलेल्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांना चांगलाच चिमटा काढला.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यकारी अध्यक्ष आणि इतर पदांवर अनेक नेत्यांची वर्णी लावली. मात्र, यात अजित पवारांना स्थान दिलं. अशावेळी आता अजित पवारांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की, त्यांना पक्षात जबाबदारी हवी आहे. त्यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की, आता अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पद हवं आहे. असं असताना याच कार्यक्रमात जयंत पाटलांनी अगदी पुणेरी पद्धतीने अजित पवारांना टोमणा मारला.
‘दादांनी महिने मोजले आहेत माझे…’, पाहा जयंत पाटील काय म्हणाले!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘पक्षाच्या बूथवरचा आग्रह.. अजितदादांनी मगाशी सांगितलं.. माझी विनंती आहे.. मी गेले आता 5 वर्ष 1 महिना मी अध्यक्ष आहे.. दादांनी महिने मोजले आहेत माझे. बरोबर.. माझे 5 वर्ष 1 महिना.. काय सांगतोय.. महाराष्ट्रात बूथ कमिट्या करा.. सांगतोय की नाही? बरेच जण करतायेत. करत नाही असं नाही. पण प्रत्येकाने बूथ कमिटी खरंच बांधा.. आपण कितीही मोठ्या घोषणा दिल्या.. कितीही भाषणं केली… पण ग्राऊंडवर आपली फिल्डिंग नसेल तर काही खरं नाही.’
हे ही वाचा >> ‘मला विरोधी पक्ष नेतेपद नको, फक्त…’, शरद पवारांसमोरच अजितदादांनी टाकला नवा बॉम्ब
‘ज्या मतदारसंघात 2019 साली जिथे आपला विजय झाला त्या सगळ्या मतदारसंघात आपल्या बूथ कमिट्या चांगल्या केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी आपण काठावर पराभूत झालो तिथे देखील बूथ कमिट्या होत्या. पण जिथे आम्ही बूथ कमिट्यांकडे लक्ष दिलं नाही.. तिथे 30-40 हजार मतांनी पराभव झाला.’
‘म्हणून माझी विनंती आहे.. खरं म्हणजे दादा तुमच्याकडे कोणी काम घेऊन आलं ना.. तर त्याला सांगायचं.. तू कोणत्या बूथ कमिटीत काम करतो सांग.. तुझा बूथ नंबर सांग.. एवढं जरा लिहून घ्यायला सुरुवात करा.. सगळे बूथ कमिटी करायला लागतील.’ असं म्हणत जयंत पाटलांनी एक प्रकारे अजित पवारांनाच टोमणा लगावला आहे.
हे ही वाचा >> Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते…”
दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्षातून शरद पवार नेमका कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT