Sharad Pawar vs Ajit Pawar : बंड केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या गटाला फोटो वापरण्याला मज्जाव केला. मात्र, तरीही अजित पवार गटाकडून शरद पवारांचे फोटो वापरले गेले. यावरूनच शरद पवार यांनी अजित पवारांवर पहिला हल्ला केला. त्यांचं नाणं खोटं आहे म्हणून ते फोटो वापरताहेत, असं म्हणत पवारांनी बरंच काही सुनावलं. (Sharad Pawar Attack On Ajit Pawar Over use his photo)
ADVERTISEMENT
वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले, “आजची बैठक ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या बैठकीकडे आहे. संपूर्ण देशात चर्चा आहे की, 24 वर्षांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. षण्मुखानंदमध्ये बैठक झाली आणि शिवाजी पार्कवर मोठी सभा झाली. 24 वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं.”
वाचा >> ‘शरद पवारांनी भाजपसोबत सरकार बनवायचं ठरवलं आणि मग…’ अजित पवारांचं मोठं वक्तव्य
“कुणी खासदार झालं, कुणी आमदार झाले. मंत्री झाले. सामान्य कुटुंबातील मुलगा राजशकट चालू शकतो हे राष्ट्रवादीने दाखवून दिलं. महाराष्ट्रातील शेवटच्या माणसांमध्ये प्रकाश कसा येईल, याची काळजी घेतली. त्यात यशस्वी झालोय. आपल्याला पुढे जायचं आहे. संकट खूप आहेत”, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
भाजपवर पवारांचा घणाघात
“ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही, त्यांच्या हातात देशाची सुत्रं आहेत. त्यांच्या पुढं त्यांच्या सहकाऱ्यांनाही मनातील कल्पना मांडण्याच्या मर्यादा आहे. मी अनेकांच्या सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम केलंय. दिल्लीत विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. त्या सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट बरोबर नसेल, तर जनतेची भावना वेगळी असेल, तर त्यासंबंधी सुसंवाद साधणं त्यातून मार्ग काढणं हे सुत्रं या देशात अनेक वर्षांपासून सुरू आहे”, असा घणाघात शरद पवारांनी भाजपवर केला.
वाचा >> शरद पवारांचं पारडं जड की, अजित पवाराचं; कुणाकडे किती आमदार? नावं आली समोर
“राज्य नाही, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण, दिसतंय काय? पक्षाच्या ऑफिसमध्ये गडबड केली. काही लोकांनी ताबा घेतला. ऑफिस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, तुम्ही राष्ट्रवाद काँग्रेसमध्ये आहात का? तुम्ही सांगितलं की आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस. उद्या कुणी उठलं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेना आहे, मी भाजप आहे सांगायला गेलं, तर याला काय अर्थ आहे. त्यामुळे अशाप्रकारचं मत सांगून भूमिका मांडून एकप्रकारे ताबा घेणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये अयोग्य आहे पण, ती झाली”, असंही पवार म्हणाले.
नाणं खरं नाहीये
“आज अनेक गोष्टी सांगता येतील. मी काही मित्रांना त्यांच्याबद्दल भाष्य करू इच्छित नाही. काही लोकांनी भाषणं केली. माझ्याबद्दल बोलले. त्यांनी हे सांगितलं की ते माझे गुरू आहेत. माझ्या काही मित्रांची बैठक झाली. त्यांच्या पाठीमागचे फोटो बघितले का? त्यात सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत सुद्धा अनेक पोस्टर्स लागली, त्यावर माझा फोटो होता. त्यांना माहितीये की आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणार नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाहीये. खणकन वाजत नाहीये. नको उगीच अडचण लावून टाका तो फोटो”, असं म्हणत पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.
ADVERTISEMENT