नीलम गोऱ्हेंनी पुण्यात केला होता दंगल घडवण्याचा प्रयत्न, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

मुंबई तक

• 04:00 PM • 29 Oct 2023

कोणत्याही दंगली हा अचानक घडत नसतात, तर त्या पूर्वनियोजित आणि ठरवून केल्या जातात असा गंभीर आरोप करत पुणे बंदच्या वेळी दंगल घडवण्याचं कट नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांनी रचला होता असा खळबळजनक आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर या त्यांच्या आत्मचरित्रातून केला आहे.

neelam gorhe tried to create a riot in Pune meera borwankar serious accusation

neelam gorhe tried to create a riot in Pune meera borwankar serious accusation

follow google news

Meera Borwankar: काही दंगली या अचानक घडत नाहीत, तर त्यातील काही दंगली या ठरवून केल्या जातात असा गंभीर आरोप माजी पोलीस आयुक्त (Former Police Commissioner) मीरा बोरवणकर यांनी केला आहे. मीरा बोरवणकर यांनी मुंबई तकला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. दंगलीविषयी बोलताना त्यांनी राज्यातील दंगली विषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण पुण्यात झालेल्या दंगलीत विधान परिषदेच्या उपसभापती (Legislative Council Deputy Speaker ) असणाऱ्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्यासह मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावरही त्यांनी दंगलीवरुन गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

हे वाचलं का?

दंगल असते पूर्वनियोजित

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या आत्मचरित्रातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचेही धाबे दणाणले आहेत. ज्या प्रमाणे त्यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी विधान सभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरही त्यांनी दंगली भडकवण्याचे आणि दंगली करण्याचा गंभीर आरोप केले आहेत.

हे ही वाचा >> याकूब मेमनच्या मुलीला पासपोर्ट मिळावा यासाठी मीरा बोरवणकरांनी का केला होता प्रयत्न

राजकीय नेत्यांविरोधात तक्रार नाही

नीलम गोऱ्हे यांनी मॅडम कमिशनरमध्ये लिहिलेल्या पुण्यातील दंगलीच्या घटनेवरुन त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, पुण्यातील दंगलीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, पुणे बंदमध्ये कुठे कुठे आणि कशा प्रकारे दंगली घडवल्या पाहिजे हे मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेले रेकॉर्डिंग आमच्याकडे होते. मात्र ते प्रकरण पोलिसात दाखल करायला आमचेच पोलीस स्टेशन दाखल करायला तयार नव्हते. त्यावेळी मला असंही सुनावण्यात आले होते की, तुम्हाला जर मुंबई कमिशनर बनायचे असेल तर हे प्रकरण तुम्ही दाखल करु नका असं मला माझ्याच खात्यातील लोकांनी सुनावले होते.

पोस्टिंग मिळणार नाही

मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे होते. मात्र तरीही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करता आली नाही. त्यावेळी राजकीय नेत्यांविरोधात जर तुम्ही तक्रार दाखल केली तर तुम्हाला पोस्टिंग मिळणार नाही असंही त्यांनी धक्कादायक माहिती सांगितली.

खळबळजनक माहिती

यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, नागरिकांना आणि माध्यमांनाही माहिती होते की, त्याकाळी माझ्याकडे दंगली घडवण्याचे माझ्याकडे सबळ पुरावे होते. त्याचबरोबर त्याकाळी केलेली दंगल ही ठरवून केलेली दंगल होती अशी खळबळजनक माहितीही त्यांनी यावेळी सांगितले.

    follow whatsapp