New Parliament Buidling Inaugration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्धाटन करण्यात आले आहे. या उद्धाटनाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या उद्धाटनाला साधु,संत आणि महत्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर देशातील विरोधी पक्षानी या उद्धाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्धाटन व्हावे अशी विरोधी पक्षाची मागणी होती. (new parliament building inaugration bye pm narendra modi om birla)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते. तामिळनाडूतील अधिनाम संतांनी धार्मिक विधीनंतर सेंगोल पंतप्रधान मोदींना सुपूर्द केले होता, त्यानंतर पंतप्रधान मोदींनी नवीन संसदेच्या लोकसभा इमारतीमध्ये तो स्थापित केला होता. या संदर्भातील व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी साधु महंतासह सेंगोल घेऊन नवीन संसद भवनात प्रवेश करत आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सेंगोल संसदेच्या लोकसभा इमारतीमध्ये तो स्थापित केला होता.
ADVERTISEMENT