Nitish Kumar: बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावरुन केलेल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ माजला आहे. त्यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महिला आयोगापासून (Commission for Women) सामान्य लोकांपर्यंत अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. नितीश कुमार यांच्या त्या वक्तव्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे की, त्यांनी देशातील तमाम महिलांची माफी मागावी. तर त्यांच्या त्याच वक्तव्यावरून सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
तर काही लोकांनी त्यांच्या त्या विधानाला अश्लील वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. विधानसभेतील एक नेता अशा प्रकारची कशी काय भाषा वापरु शकतो असा सवालही सोशल मीडियावरुन उपस्थित करण्यात आली आहे.
निर्लज्ज पातळीवरचं विधान
ध्रुव त्रिपाठी नावाच्या युजरने लिहिले, नितीश कुमार यांच्या त्या वक्तव्याबद्दल म्हटले आहे की, ‘लैंगिक शिक्षण समजावून सांगण्याचा इतरही अनेक मार्ग आहेत. त्यामुळे अशा प्रकारची ही भाषा नितीश कुमार यांनी शोभत नाही. कारण ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांना त्यावर भाषण करायचेच होते तर त्यांनी त्यांच्या सचिवांना विचारुनही ते चांगले भाषण करु शकले असते असते, मात्र तसं काही झालं नाही. कारण त्यांच्यासारख्या नेत्याकडून विधानसभेची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे पण तसं काही झालं नाही. त्यांनी केलेले विधान हे अत्यंत निर्लज्ज पातळीवरचं विधान होते अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
हे ही वाचा >> Kalyan: अल्पवयीन विवाहित मुलीचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमकं काय घडलं?
लज्जास्पद विधान
तर यती शर्माने लिहिले आहे की, ‘नितीश कुमार यांनी राजकारणाची प्रतिष्ठा नष्ट केली आहे. एवढे घाणेरडे आणि लज्जास्पद विधान अजून मी कोणत्याही मोठ्या नेत्याकडून ऐकले नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
निर्लज्जपणाच्या मर्यादा ओलांडल्या
अमिताभ चौधरी या युजरने तर नितीश कुमारांच्या अशा बेताल वक्तव्याचा इतिहासच सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नितीश कुमार यांच्याकडून विधानसभेतही आणि बाहेरही त्यांच्याकडून अशी बेताल आणि अश्लील वक्तव्यं केली गेली आहेत.
त्यांनी अशा प्रकारची घाणेरडे विधान करुन त्यांनी प्रत्येक वेळी निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे विधान करत असताना त्यांच्या मागे एक महिला मंत्रीही बसल्या आहेत, मात्र त्यांचे विधान ऐकून त्या अस्वस्थ झाल्या आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
भाषा असंसदीय
लक्ष्मी सिंह यांनी तर त्यांच्या मेंदूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. बिहारचे मुख्यमंत्र्यांकडून वापरण्यात आलेल्या वक्तव्याचा अगदी उच्चस्तरावरुनही त्याचा निषेध केला पाहिजे. त्यांनी वापरलेली भाषा ही अगदी असंसदीय होती. त्यांचे शब्द हे महिलांची बदनामी करणारे आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या विधानानं धक्का
बिहार विधानसभेत मंगळवारी नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रण तत्त्व स्पष्ट करताना बेताल वक्तव्य केले आहे. त्यांचा तो व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांनी विधान केल्यावरही विधानसभेतील सदस्यांमधून ते वक्तव्य त्यांचे हसण्यावर घेण्यात येत आहे. तर महिला मंत्री अगदीच शांत बसून होत्या. जात सर्वेक्षणाचा अहवालावर सविस्तर चर्चा करताना नितीश यांनी सांगितले की, महिला शिक्षणामुळे राज्यातील लोकसंख्या नियंत्रित करण्यात मदत झाली आहे. मात्र जेव्हा त्यांनी यावर सविस्तर बोलण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र अनेकांना त्याचा धक्का बसला आहे.
महिलांना शिक्षित केलं आणि…
नितीश कुमार म्हणाले, ‘लग्नानंतर पुरुष आपल्या पत्नीला लैंगिक संबंध ठेवण्यास सांगतात. मात्र आपण बिहारच्या महिलांना ज्यावेळी शिक्षित केल्यामुळे त्या योग्य वेळी आपल्या पतींना तसं करण्यापासून त्या थांबवू शकतात. त्यामुळेच बिहारची लोकसंख्या नियंत्रणात असल्याचे वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT