Nitish Kumar : ‘लग्नानंतर पुरुष रोज रात्री करतात ना…’, मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत तोल सुटला

प्रशांत गोमाणे

• 01:36 PM • 07 Nov 2023

बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. जर एक मुलगी शिकली सवरली असेल तर ती लोकसंख्या नियंत्रणात ठेवते. ही गोष्ट सभागृहातील आमदारांना समजून सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरणही दिले.

nitish kumar shocking statement on women education and population statement vidhansabha video viral

nitish kumar shocking statement on women education and population statement vidhansabha video viral

follow google news

Nitish kumar Viral Video : बिहारमध्ये जातीनिहाय गणना नुकतीच पार पडली आहे. या जातीनिहाय गणनेनंतर त्याची आकडेवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. आता हाच जातीनिहाय गणनेचा मुद्दा बिहारच्या विधानसभेत चर्चेला आला होता. या मुद्यावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नीतीश कुमार लोकसंख्या नियंत्रण आणि महिलांच्या शिक्षणावर बोलत होते. यावेळी उदाहरणासहित ही गोष्ट सभागृहाला समजावत असताना ते भलतंच बरळून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा विधानसभेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेमके ते व्हिडिओत काय म्हणालेत हे जाणून घेऊयात. (nitish kumar shocking statement on women education and population statement vidhansabha video viral)

हे वाचलं का?

विधानसभेतील चर्चेदरम्यान नितीश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. जर एक मुलगी शिकली सवरली असेल तर ती लोकसंख्या नियंत्रणात ठेवते. ही गोष्ट सभागृहातील आमदारांना समजून सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरणही दिले.

हे ही वाचा : ‘आज महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची गरज होती’, ‘हा’ मराठी अभिनेता थेटच बोलला!

जेव्हा एक मुलगी शिकलेली असेल आणि तिचे लग्न होईल. तेव्हा पुरूष रोज रात्री करतात ना…त्यातच आणखीण मुलं जन्माला येतात. पण जेव्हा एखादी मुलगी शिकलेली असेल , तर ती पुरषाला आत ठेवू देणार नाही, यामुळेच लोकसंख्या नियंत्रणात राहिल असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान नितीश कुमार हे उदाहरण देताना सभागृहात फारच विचित्र परिस्थिती होती. महिला आमदारांना तर या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

सभागृहातील आपल्या भाषणात नितीश कुमार म्हणाले, 2011 च्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण 61 टक्क्यावरून 79 टक्क्यांवर पोहोचले आहे. ‘महिला साक्षरतेत बरीच सुधारणा झाली आहे. साक्षरतेचा आकडा 51 टक्क्यांवरून 73 टक्क्यांच्यावर गेला आहे. स्त्री शिक्षणाची स्थिती बरीच सुधारली आहे. मॅट्रिक पासची संख्या 24 लाखांवरून 55 लाखांवर गेली आहे. यापूर्वी इंटर पास महिलांची संख्या 12 लाख 55 हजार होती. आता तो 42 लाखांच्या वर आहे. पदवीधर महिलांची संख्या 4 लाख 35 हजारांवरून 34 लाख झाली आहे.

हे ही वाचा : चहासाठी डॉक्टरने ऑपरेशनच सोडलं अर्धवट, नागपूरमधील खळबळजनक घटना

नितीश कुमार यांनी यावेळी मोठी घोषणा देखील केली. बिहारमध्ये ओबीसी आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. मुख्यमंत्री नितीश यांनी राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50 वरून 65 करण्याचा प्रस्ताव मांडला. EWS च्या 10 टक्के समावेश करून आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. दरम्यान सध्या नितीश कुमारांचा विधानसभेतला तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देतायत.

    follow whatsapp