Abdul Sattar Survey of farmers losses : राज्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी सध्या राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) करतायत. या दरम्यान एका शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार संध्याकाळी पोहोचले होते. यावेळी सत्तारांनी अंधारात नेमकी काय पाहणी केली, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. हे प्रकरण ताजे असतानाचा आता अब्दुल सत्तारांचे हिंगोलीतील सभेचे भाषण खुप गाजतेय. या सभेत त्यांनी ‘कोणाचीही सत्ता असो आपण पक्के’ असे विधाने केले होते.त्यांच्या या विधानानंतर सभेत एकच हशा पिकला होता. (No matter who is in power we are confirm Abdul Sattar hingoli statement)
ADVERTISEMENT
राज्याचे कृषी मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागात पाहणी केली. त्यानंतर ते हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित कृषी महोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झाले होते. माझ्या नावात सत्तार आहे, कोणाचीही सत्ता आली कि आपण पक्के असं म्हणताच सभेच्या ठिकाणी एकच हशा पिकला होता.
Ajit Pawar : “तेव्हा मलाही वेदना व्हायची की, काय बोलण्याची पाळी येतीये”
जेव्हा राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या गोष्टी असतात, तेव्हा सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. ज्यावेळी शेतकऱ्यांची क्रांती घडवायची असेल आणि शेतकऱ्याला मदत करायची असेल तर राज्याची तिजोरी असो किंवा केंद्राची तिजोरी असो याचा सगळ्यात मोठा वाटा शेतकऱ्याच्या वाट्याला जायला हवा.कृषी मंत्री म्हणून माझी हिच भावना राहील, असा विश्वास सत्तार(Abdul Sattar) यांनी यावेळी व्यक्त केला.
sanjay Raut : राऊतांची खासदारकी धोक्यात? प्रकरण उपराष्ट्रपतींच्या कोर्टात
ये जमाना दाढी वाले का हैं!
मी तुमच्या सारखाच एका सामान्य कुटुंबातून आलोय. बस माझी बॅटरी चार्ज केली आणि मी इथंपर्यंत आलो.शेवटी नावात सत्तार आहे. त्यामुळे कोणाचीही सत्ता आली कि आपण पक्के असं म्हणताच सभेच्या ठिकाणी एकच हश्या पिकला होता.पुढच्या सहा महिन्यात सर्व पदे भरले जातील आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना,अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असल्याने त्यांना फार चिंता लागली. त्यामूळे त्यांची दाढी वाढलीय. पण ये जमाना दाढी वाले का हैं! अशी डायलॉगबाजी करताच हास्यांचा कारंजा फुलला.
ADVERTISEMENT