Parambeer Singh New Allegation : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता आरोपांचा नवा बॉम्ब फोडला आहे. या आरोपात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांबाबत (Anil Deshmukh) अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी बैठका झाल्या होत्या. या बैठकीत भाजपच्या अनेक नेत्यांना अटक करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. नेमक्या भाजपच्या कोणत्या नेत्यांना अडकवण्याचा डाव होता? आणि परमबीर सिंह यांचा आरोप काय आहे? हे जाणून घेऊयात. (parambeer singh big allegation on anil deshmukh sharad pawar udhhav thackeray devendra fadnavis maharashtra politics)
ADVERTISEMENT
परमबीर सिंह यांनी एनआयला प्रतिक्रिया दिली आहे. ''ठाण्यातील एका जमीन प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यात मलाही गोवण्याचा प्रयत्न झाला'', असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. ''ऐवढेच नाही तर या प्रकरणी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचेही आदेश देण्यात आले होते. हे सर्व संजय पांडे यांच्या मार्फत सुरू होते. आणि त्यांना डायरेक्ट आदेश अनिल देशमुख, शरद पवार आणि तत्काली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळत होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात माझ्याकडे व्हिडिओ पुरावे देखील आहे, आणि वेळ आल्यावर ते सादर देखील करेन'', असे सिंह यांनी सांगितले.
हे ही वाचा : Raj Thackeray : ''शरद पवारांसारखा 83 वर्षांचा माणूस...'', राज ठाकरे काय बोलून गेले?
परमबीर सिंह पुढे म्हणाले, ''अनिल गोटे नावाचे माजी आमदार आहेत, चव्हाण नावाच्या सरकारी वकिलासह मुंबईत आले होते. त्यांची अनिल देशमुखांसोबत मी मिटींग झाली होती. या मिटींगला मलाही बोलवण्यात आले होते. त्यावेळेस माझ्यावर गिरीष महाजन आणि जयकुमार रावल यांनाही अटक करण्यासाठी आपल्यावर दाबव टाकला होता असंही त्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा सिल्व्हर ओकवर एक बैठक बोलावली होती या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. त्यावेळेस देखील माझ्यावर गिरीष महाजन आणि जयकुमार रावल यांच्या अटकेसाठी दबाव टाकला होता'', अशा खळबळजनक दावा परमबीर सिंह यांनी केला.
''उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सुद्धा एक बैठक झाली होती. या बैठकीला अनिल देशमुख उपस्थित होते. त्यावेळेस प्रविण दशिवाय मुंबई बँकेचे संचालक प्रविण दरेकर यांच्या विरोधातही कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र असे करण्यास आपण नकार दिली होता,'' असेही ते म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले?
मी एवढं सांगेन की त्यांनी मला अटक करण्या संदर्भात आणि भाजप नेत्यांना अटक करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलेले आहे ते पूर्णपणे सत्य आहे, याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी एकच इन्सिडेंट सांगितला असे चार इन्सिडेंट आहे, ज्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याच षडयंत्र झालx परंतु हे सगळे षड्यंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करून चुकलो आणि व्हिडिओ पुरावे आम्ही सीबीआयला दिले, आजही आमच्याकडे अनेक व्हिडिओ पुरावे त्याचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Raj Thackeray : ''माझ्या नादी लागू नका, नाहीतर...'', ठाकरे, पवारांना राज ठाकरेंचा इशारा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी असेन,गिरीश महाजन असेल,प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते असे ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती. काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते करू शकले नाही कारण अनेक चांगले अधिकारी होते ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
दरम्यान आता परमबीर सिंह यांच्या या आरोपावर आता महाविकास आघाडीचे नेके काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT