Chawadi: 20 वर्षांपूर्वीच महाविकास आघाडी झाली असती, फक्त…; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट

मुंबई तक

• 04:26 PM • 16 Jun 2023

1999 साली काँग्रेसला दूर सारून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि शिवसेनेसोबत युतीमध्ये सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव वाजपेयी यांनी दिला असल्याचा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केला आहे.

Praful Patel has revealed that in 1999, Vajpayee had proposed that NCP should form a government in alliance with BJP and Shiv Sena after alienating Congress.

Praful Patel has revealed that in 1999, Vajpayee had proposed that NCP should form a government in alliance with BJP and Shiv Sena after alienating Congress.

follow google news

मुंबई: राज्यात 2019 पासून महाविकास आघाडीचा (mahavikas aghadi) प्रयोग पाहायला मिळतोय. जो 2022 पर्यंत यशस्वी देखील ठरला होता. कारण तब्बल तीन पक्ष एकत्र येऊन साधारण अडीच वर्षांपर्यंत सत्तेत होते. मात्र, महाविकास आघाडीचा हाच प्रयोग तब्बल 20 वर्षांपूर्वीच म्हणजेच 1999 सालीच महाराष्ट्राला पाहायला मिळाला असता. असा गौप्यस्फोटच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी केला आहे. मुंबई Tak च्या ‘चावडी’वर बोलताना प्रफुल पटेल यांनी 1999 साली विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला आलेल्या एका मोठ्या ऑफरबाबत पहिल्यांदाच सांगितलं. (praful patel 1999 atalbihari vajpayee proposed ncp should form a government alliance bjp shiv sena 20 year before mahavikas aghadi congress)

हे वाचलं का?

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती आणि त्याचवेळी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका देखील झाल्या होत्या. या निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत नव्हतं. त्याच वर्षी राष्ट्रवादी या नव्या पक्षाने महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या प्रमाणात जागा मिळविल्या होत्या. अशावेळी काँग्रेसला दूर सारून राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन करावं अशी खुली ऑफर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली असल्याचा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी आज (16 जून) चावडीवर बोलताना केला.

पाहा प्रफुल पटेलांनी नेमका काय केला गौप्यस्फोट

‘1999 साली काँग्रेसपासून आम्ही दूर गेलो, आम्ही नवीन पक्ष स्थापन केला. 99 साली आम्ही निवडणूक वेगळी लढली होती. स्वाभाविक आहे की, आम्ही बाहेर पडलो होतो ना. त्यावेळी राजीनामा देऊन लवकर निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या होत्या. आमचा पक्ष तेव्हा नवीन होता.’

हे ही वाचा >> शरद पवारांचं केसी राव यांच्या भारत राष्ट्र समितीबद्दल मोठं विधान; म्हणाले…

‘त्यावेळी आम्ही थोडे कमी पडलो.. आम्हाला वाटलं होतं की आम्ही एक नंबरचा पक्ष असू.. पण ऐनवेळी आम्हाला घड्याळ चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी केंद्रात वाजपेयींचं सरकार निवडून आलं होतं. त्यावेळी काँग्रेसबरोबर जावं की न जावं हा मोठा सवाल होता. कारण आम्ही त्यांच्याविरोधात लढलो होतो.. काँग्रेसमधून बाहेर पडलो होतो. काँग्रेसने शरद पवारांना विचित्र वागणूक दिली होती. म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती.’

‘वाजपेयी हे एवढे चांगले व्यक्ती होते. त्यांना सर्वमान्यता होती. त्यावेळी वाजपेयीजींनी स्वत: प्रस्ताव दिला होता की, तुम्ही आमच्याबरोबर या.. काँग्रेसला बाजूला करा आणि मुंबईमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार बनवा आणि दिल्लीत शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं. वाजपेयींनी हा प्रस्ताव दिला होता.’

हे ही वाचा >> Chawadi: ‘साहेबांशी माझे संबंध कसे हे कळायला अजित पवारांना…’, प्रफुल पटेल असं का म्हणाले?

‘पण त्यावेळी पक्षात असं ठरलं की, काँग्रेससोबतच आपण राहिलं पाहिजे. कारण स्थानिक लोकांना काँग्रेससोबत जुळवून घेणं हे सोयीस्कर ठरणार होतं. म्हणून तो प्रस्ताव आम्ही स्वीकारला नाही. पण या भूमिकेमुळे शरद पवारांना जास्त फायदा झाला.’ असं प्रफुल पटेल यांनी यावेळी म्हटलं आहे.

आता प्रफुल पटेल यांनी केलेल्या या दाव्याबाबत आता भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp