Maharashtra Latest Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री तर इतर 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी फुटली होती. मात्र या फुटीचे कारण समोर आले नव्हते. आता राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या फुटीमागचं कारण सांगितले आहे. (praful patel tell the reason of ncp split ajit pawar dcm bjp shinde government maharashtra politics)
ADVERTISEMENT
मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांची मुलाखत घेतली होती.या मुलाखतीत प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी फुटीचे कारण सांगितले आहे. महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे गेल्याने सगळच संपले ना. राज्यात शिवसेना ज्यावेळेस फुटली तेव्हा आम्ही सर्व एकत्र होतो. पण शिवसेना स्वत:च्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून भासवत होती, अशी टीका प्रफुल पटेल यांनी यावेळी शिवसेनेवर केली.
महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची युती होणार होती, या युतीत राष्ट्रवादीलाच खास करून तडजोड करावी लागली होती. कारण आम्हाला माहिती होते, शिवसेनेची एक वेगळी भूमिका असेल, कॉंग्रेसची वेगळी भूमिका असेल, त्यामुळे तडजोड फक्त राष्ट्रवादीलाच करावा लागणार आहे अशी खंत देखील प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली होती. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्येही तडजोड करावी लागणार आहे आणि महाविकास आघाडीतही करत होतो, असे देखील प्रफुल पटेल यांनी सांगितले.
प्रफुल पटेल पुढे म्हणतात, कितीही म्हटलं तरी भाजप हा राज्यातली सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे उप मुख्यमंत्री पद असले तरी त्यांना 115 आमदारांचे समर्थन असून महाराष्ट्रात तो भक्कमपणे उभा आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे असले तरी आम्ही अजित पवारांच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले गेलो आहोत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एक स्थिरता आहे, असे देखील पटेल म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीने निवडणूक लढवून ती जिंकावी आणि सरकार बनवावे तशी परीस्थिती बनत नाही आहे. त्यामुळे आम्ही परिस्थितीनुसार निर्णय़ घेत असतो. आज आम्ही जो निर्णय घेतलाय तो महाराष्ट्राच्य़ा हितासाठी, विकासासाठी घेतला असल्याचे कारण प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवसेना-भाजपात काय फरक आहे, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही यांच्यासोबतही आहोत, तर त्यांच्यासोबतही आहोतच, असे देखील प्रफुल पटेल यांनी सांगितले.
मी शरद पवार यांच्या कोणत्याही गोष्टीवर टीका करणार नाही, ते माझे मार्गदर्शक आहेत, काल होते, आज होते आणि पर्वाही असतील, असे देखील प्रफुल पटेल यांनी सांगितले.
ADVERTISEMENT