Prakash Ambedkar : 'मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस', आंबेडकरांची बोचरी टीका

मुंबई तक

05 Aug 2024 (अपडेटेड: 05 Aug 2024, 05:39 PM)

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आज अमरावती जिल्ह्यातून त्यांचा राजकीय गढ असलेल्या अकोला जिल्ह्यात पोहोचलीय. ही यात्रा मुर्तिजापूर येथे पोहोचल्यावर झालेल्या सभेत त्यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली.

 प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा अकोला जिल्ह्यात पोहोचलीय.

prakash ambedkar criticize manoj jarange patil maratha reservation obc arkshan bachav rally akola

follow google news

बातम्या हायलाइट

point

जरांगेंनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर...

point

मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस

point

प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगेंवर टीका

Prakash Ambedkar Criticize Manoj Jarange : धनंजय साबळे, अकोला :  मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनीच आता त्यांच्यावर गंभीर टीका केली आहे. ''मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे. जर त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर यावर शिक्कामोर्तब होईल'', अशी टीका आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केली आहे. ( prakash ambedkar criticize manoj jarange patil maratha reservation obc arkshan bachav rally akola) 

हे वाचलं का?

 प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आज अमरावती जिल्ह्यातून त्यांचा राजकीय गढ असलेल्या अकोला जिल्ह्यात पोहोचलीय. ही यात्रा मुर्तिजापूर येथे पोहोचल्यावर झालेल्या सभेत त्यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. ''मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे, अशी चर्चा आहे. जर त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल असं ते म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Bangladesh Violence: आरक्षणाच्या वादामुळे पंतप्रधानपद गेलं, बांग्लादेशात तुफान हिंसाचार.. शेख हसीना भारतात!

 मनोज जरांगेवरून उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेवर आंबेडकरांनी जोरदार जोरदार टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाची भूमिका म्हणजे कोंबड्यांच्या खुराड्यात कोब्रा सोडण्यासारखी असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला आहे. तर आपण ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर महाराष्ट्रात दंगली झाल्या असत्या असेही आंबेडकर म्हणाले आहेत. आपल्या यात्रेनंच महाराष्ट्रातील वातावरण निवळल्याचं ते म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : MNS : विधानसभेसाठी राज ठाकरेंचे तीन शिलेदार ठरले...

राज ठाकरेंना टाडा कायद्यान्वये अटक करावी 

राज ठाकरे यांना टाडा कायद्या अन्वये अटक करावी,  सरकारने तशी हिंमत दाखवावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकारने मागे पुढे न पाहता त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. महाराष्ट्राचा माणूस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये आहे. गुजरातमध्ये मराठी माणसं आहेत, त्यांचं काय करायचं? समाज दुभंगण्याची हे वक्तव्य करत आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. नॅशनल सिक्युरीटी अॅक्ट आणि युपीएच्या कायद्यान्वये कारवाई झाली पाहिजे.टाडा तर तातडीने लागला पाहिजे, सरकारने हिंमत दाखवून त्यांना अटक करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.  

    follow whatsapp