Maharashtra Assembly Election : अजित पवारांविरूद्ध उमेदवार ठरला, वंचितची पाचवी यादी जाहीर

मुंबई तक

19 Oct 2024 (अपडेटेड: 21 Oct 2024, 06:30 PM)

Prakash Ambedakar, Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडरांच्या वंचित बहूजन आघाडीचे पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 16 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तसेच आंबेडकरांनी या यादीत बारामतीतून अजित पवारांविरूद्द उमेदवार जाहीर केला आहे.

maharashtra assembly election 2204 prakash ambedkar vanchit bahujan aghadi declare fifth list ajit paqar against candidate declare

वंचितची पाचवी यादी जाहीर

follow google news

बातम्या हायलाइट

point

वंचितची चौथी यादी जाहीर

point

16 जणांची उमेदवारी जाहीर

point

67 मतदारसंघात वंचित कडून उमेदवार जाहीर

Prakash Ambedakar, Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडरांच्या वंचित बहूजन आघाडीचे पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 16 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तसेच आंबेडकरांनी या यादीत बारामतीतून अजित पवारांविरूद्द उमेदवार जाहीर केला आहे. हा उमेदवार कोण आहे? आणि इतर 15 जांगावर वंचितने कुणाला संधी दिली आहे? हे जाणून घेऊयात.  (maharashtra assembly election 2204 prakash ambedkar vanchit bahujan aghadi declare fifth list ajit paqar against candidate declare) 

हे वाचलं का?

बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. याच बारामतीत आता वंचितने उमेदवार उभा केला आहे. वंचितने मंगलदास निकालजे यांना बारामतीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निकालजे यांची लढत थेट अजित पवारांशी होणार आहे. 

वंचितची पाचवी यादी 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 16 उमेदवारांचा समावेश आहे.

जगन सोनवणे- भुसावळ 
डॉ. ऋतुजा चव्हाण - मेहकर 
सुगत वाघमारे - मूर्तिजापूर 
प्रशांत गोळे-रिसोड 
लोभसिंह राठोड- ओवळा माजिवडा 
विक्रांत चिकणे- ऐरोली 
परमेश्वर रणशुर- जोगेश्वरी पूर्व 
राजेंद्र ससाणे - दिंडोशी 
अजय रोकडे - मालाड 
अँड. संजीवकुमार कलकोरी-अंधेरी पूर्व 
सागर गवई - घाटकोपर पश्चिम 
सुनिता गायकवाड- घाटकोपर पूर्व 
आनंद जाधव- चेंबूर 
मंगलदास निकालजे- बारामती 
अण्णासाहेब शेलार-श्रीगोंदा 
डॉ.शिवाजीराव मरेप्पा देवनाळे - उदगीर 


 

दरम्यान याआधी विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील यांना रावेर मतदारसंघातून  तिकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 16 उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.

हे ही वाचा : Sanjay Raut: '...तर महाराष्ट्रातल्या मतदारांचा विराट मोर्चा निघेल', संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला इशारा

वंचितची चौथी यादी 

अलीबाबा रशिद तडवी : शहागा 
भिमसिंग बटन : साक्री 
भगवान भोंडे : तुमसर 
दिनेश रामरतन पंचभाई : अर्जुनी मोरगाव 
दिलीप राठोड : हदगाव 
रमेश राठोड  : भोकर 
दिलीप तातेराव मस्के : कळमनुरी 
मनोहर जगताप : सिल्लोड
अय्याज मकबूल शाह :कन्नड 
अंजन लक्ष्मण साळवे : औरंगाबाद पश्चिम 
अरूण सोनाजी घोडके : पैठण 
आरीफ अब्दुल्ला खान देशमुख : महाड 
प्रियांका शिवप्रसाद खेडकर : गेवराई
 वेदांत सुभाष भादवे : आष्टी 
 चंद्रकांत जानू कांबळे : कोरेगाव 
 संजय कोंडीबा गाडे : कराड दक्षिण 

दरम्यान वंचितकडून पहिल्या तीन यादीतून 51 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत 67 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 

    follow whatsapp