Maha Vikas Aghadi Lok Sabha Seat Sharing : “प्रकाश आंबेडकर किंवा राजू शेट्टींनी उमेदवार उभे केले तर फायदा आणि तोटा कुणाला होणार हे स्पष्ट आहे, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दलच पृथ्वीराज चव्हाणांनी शंका घेतल्याने वंचित बहुजन आघाडी भडकली आहे.
ADVERTISEMENT
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, “काँग्रेसचे बंडखोर नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीवर गरळ ओकली आहे. पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय करू पाहत आहेत, काय घडवू पाहत आहेत, याबद्दलच आता आम्हाला शंका येऊ लागली आहे”, असे वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी लिहिलं होतं पत्र
ते पुढे म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला तीन पत्र लिहिली गेली. १ सप्टेंबर २०२३ रोजी लिहिलेलं पत्र हे आमच्या प्रवक्त्याने लिहिलेलं पत्र होतं. त्यानंतर राहुल गांधींना २५ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या संविधान सन्मान सभेसाठीचं पत्र बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं होतं. राज्य कार्यकारिणीने चार पक्षात समसमान जागावाटप करावं, हा प्रत्येकी १२ जागांचा फॉर्म्युला मांडला.”
हेही वाचा >> “…तर हा प्रसंग आला नसता”, नार्वेकरांचा संताप; ठाकरेंना सुनावलं
“त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने पुन्हा एक पत्र मल्लिकार्जून खरगे यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून दोन वेळा त्यांच्या पक्षाला पत्र गेलेलं असताना, ती पत्र समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध असताना पृथ्वीराज चव्हाण धडधडीत खोटं बोलताहेत की, वंचित बहुजन आघाडीच्या फक्त प्रवक्त्यांनी पत्र लिहिलं. पृथ्वाराज चव्हाणांचा हा राजकीय आंधळेपणा कशाने दूर होईल, मला माहिती नाही. भाजपकडून त्यांचे टेस्टिंग सुरू आहे का?”, असा सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंकडून ‘पवार पॅटर्न…’, श्रीकांत शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करायची तयारी, पण…
“काँग्रेसमध्ये राहून ते काँग्रेसचे किती नुकसान करू शकतात, याबद्दल आम्हाला शंका येऊ लागली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की, प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यात जाऊन तर मी बघू शकत नाही. जर एखाद्याच्या डोक्यात जायचं असेल आणि त्यांचं डोकं वाचायचं असेल, तर दोन पद्धतीने करता येतं. एकतर तुम्ही डॉक्टर असायला हवं किंवा तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ असायला हवं. तुम्ही दोन्हीही नाही, तुम्ही इंजिनिअर आहात. एखाद्या इंजिनिअरने कुणाच्या डोक्यात जाऊन पाहणं अवघडच काम झालं. पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसला राजकारणातून संपवायचं आहे की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना राजकारणातून नेस्तनाबूत करायचं, याबद्दल त्यांनी खुलासा केला तर बरा होईल”, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीने पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले आहे.
हेही वाचा >> Sharad Mohol हत्येमागे भलताच म्होरक्या, आतापर्यंतची सर्वात खळबळजनक अटक!
पृथ्वीराज चव्हाण यांनी काय केलेले विधान?
पृथ्वीराज चव्हाण एका मुलाखतीत म्हणालेले की, “मागच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections 2019) प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसचे नऊ खासदार पाडले, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे पाहावं लागेल. त्यांनी व्यवहारिक मागणी करून आमच्यासोबत आलं पाहिजे. ते जर आले नाहीत तर गेल्या वेळी केला तोच प्रयत्न आहे का हे तपासावं लागेल. प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे मला आत जाऊन पाहता येणार नाही. मागच्या निवडणुकीत त्यांच्यामुळे आमचे नऊ खासदार पडले हे खरं आहे.”
ADVERTISEMENT