Namo Shetkari Samman Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज महाराष्ट्र दौरा केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे (Government of Maharashtra) नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत पीएम किसान सन्मान (PM Kisan Yojana) निधी योजनेप्रमाणेच 3 समान हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
पीएम किसान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच वार्षिक 6000 रुपये मिळत राहतील. त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत 6 हजार रुपयेही दिले जाणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा>> Crime: मुंबईतील वासनांध, धावत्या लोकलमध्ये विवाहित महिलेसोबत..
फडणवीसांनी केली होती घोषणा
या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांकडे मूळ रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते तपशील असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सांगितल्या प्रमाणे प्रमाणपत्रं, जमिनीची कागदपत्रे आणि मोबाईल क्रमांक असणे अत्यंत आवश्यक असणार आहे.
लाभ कोणाला मिळणार
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे गरजेचा आहे. तसेच शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणेही गरजेची आहे. त्याचबरोबर अर्जदार शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे त्याची नोंदणी केलेली असावी असंही सांगण्यात आले आहे. अर्जदार शेतकऱ्याकडे बँक खाते असणे बंधनकारक असून ते बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे गरजेचे आहे.
महा शेतकरी योजना
केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही महाराष्ट्र सरकारने महा शेतकरी योजना सुरू केली आहे. त्यामुळे देशात प्रथमच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी कोणत्याही कृषी योजनेतून शेतकऱ्यांना थेट पैसे मिळत नव्हते.
हे ही वाचा>> Murder Case : काकाने पुतण्याचा गळा चिरला, अन् गरोदर सुनेच्या पोटातच…
किसान योजना
पंतप्रधान किसान योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्याच प्रकारच्या योजनेसारखे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही वार्षिक 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील पंतप्रधान किसान योजनेच्या सर्व पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ADVERTISEMENT