Pune Accident: अखेर 4 दिवसानंतर अजितदादा 'त्या' अपघातावर पहिल्यांदा बोलले, 'मी तर...'

मुंबई तक

• 09:25 PM • 24 May 2024

Ajit Pawar: पुणे पोर्श कार अपघाताच्या चार दिवसानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया मीडियासमोर दिली आहे. पाहा नेमकं अजित पवार काय म्हणाले.

ajit pawar speech satara rally satara lok sabha election 2024 udyanraje bhosale mahayuti candidate yashwantrao chanvan sharad pawar

मी जाहिरनाम्यातही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

follow google news

Pune Accident Ajit Pawar: पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्श कारच्या अपघातात दोन जणांना हकनाक जीव गमवावा लागला. पण हे प्रकरण उलटून तब्बल चार दिवस झालेले असताना आज (24 मे) पहिल्यांदाच पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून अजित पवार यांनी याबाबत काहीही भाष्य केलं नव्हतं. (pune accident finally after 4 days dcm ajit pawar spoke for the first time about accident)

हे वाचलं का?

पुण्यातील अपघातावरून राज्य सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीका सुरू होती. त्यातच पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी याबाबत गेल्या चार दिवसात काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आज त्यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांनं नेमकं काय-काय घडलं ते सांगितलं. 

पुणे कार अपघाताबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

'दोन्ही दिवस मी सकाळी 9 वाजेपासून मंत्रालयात होतो. या सगळ्या घटनेसंदर्भात मी लक्ष ठेवून होतो. माझं देवेंद्रजींशी बोलणं झालेलं.. देवेंद्रजी म्हणालेले की, मी तातडीने पुण्याला निघालोय. मी त्यात स्वत: जातीने लक्ष घालणार.. त्यांनी प्रकरणात लक्ष घातलं आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली.'

हे ही वाचा>> मुलाला वाचवण्यासाठी केल्या 'या' गोष्टी; विशाल अग्रवालवर दाखल होणार दोन गुन्हे

'कारण नसताना अशाप्रकारचा गैरसमज करुन दिला जात आहे की, यामध्ये पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, कोणी लक्ष घातलं नाही. मला मीडियापुढे यायला आवडत नाही. मी माझं काम करत असतो. आजही 21 तारखेला सकाळी 9 ला चेक करायचं की अजित पवार मंत्रालयात होता की नाही.. माझी कामं काय चाललेली होती.. एक तर यामध्ये कुठल्या राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे.' 

'या अशा प्रकारच्या घटना कदापि घडता कामा नये. यामध्ये कायदा-सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे त्या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याबद्दल मला वेळोवेळी पोलीस आयुक्त जी काही माहिती द्यायचे ते देत होते.' 

'आयुक्तांनीही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.. आज पण मी त्यांच्याशी बोललो.. त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट काय काय घडत गेलं ते सांगितलं यामध्ये जामीन कसा मिळाला ते पण तुम्हाला सांगितलं.'

हे ही वाचा>> आरोपी की, ड्रायव्हर... कोण चालवत होतं पोर्श कार? अखेर सत्य आलं समोर

'जामीन का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे.. पण त्यासंदर्भात सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजे तशा संदर्भात घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये कोणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही. यामध्ये पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे.' 

'यामध्ये गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी लक्ष घातलं आहे आणि मी पण स्वत: पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून माझं त्यावर बारकाईने लक्ष आहे.' 

'पुणे परिसरात काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात पब वाढले आहेत. त्याबद्दलची कारवाई जोरात सुरू करण्यात आली आहे.' असं स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिलं.

    follow whatsapp