Pune Drug Case : महायुतीत बिघाडी? अजित पवार गटाचा चंद्रकांत पाटलांवर थेट हल्ला

मुंबई तक

24 Jun 2024 (अपडेटेड: 24 Jun 2024, 06:25 PM)

Pune Drug Case News :पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केल्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मिटकरी यांनी एक्सवर ट्विट केले आहे.

pune drug case amol mitkari criticize chadrakant patil on guardian minister ajit pawar mahayuti

चंद्रकांत पाटलांच्या या टीकेवर आता अजित पवार गटाकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

follow google news

Amol Mitkari Criticize Chandrakant Patil : पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरूणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर ड्रग्जचं प्रकरण चांगलच तापलं होतं. या प्रकरणावर भाष्य करताना भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ''मी पालकमंत्री असताना अशा प्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत'', असं विधान करून अप्रत्यक्षपणे पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य केले होते. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेवर आता अजित पवार गटाकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. (pune drug case amol mitkari criticize chadrakant patil on guardian minister ajit pawar mahayuti) 
 
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केल्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मिटकरी यांनी एक्सवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी लिहले की, चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणुन चंद्रकांत दादा व्यथीत आहेत, असा टोला अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Narendra Modi शपथ घ्यायला येताच राहुल गांधींनी टाकला मोठा डाव, लोकसभेत काय घडलं?

चंद्रकांत पाटील काय म्हणाले? 

चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ''मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाही'', असं चंद्रकांत पाटील यांनी बोलताना म्हटलं. मात्र, त्यानंतर त्यांनी या विधानावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ''अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी 14 लाख होती. आता 70 लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण, रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे'', असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : फार्महाऊसवर अनैसर्गिक सेक्स, एचडी देवगौडा यांच्या दुसऱ्या नातवाला अटक

दोन बिट मार्शलच निलंबन 

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात पोलीस दलातील दोन बिट मार्शल यांचं निलंबन करण्यात आले आहे. कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित हॉटेलही सील करण्यात आले आहे. पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. हॉटेलमधील 5 जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. हॉटेलमधील ज्या ठिकाणी परवानगी नव्हती, तिथे सुद्धा मद्यसाठा ठेवला होता, त्याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. हॉटेलमधील एका मजल्यावर मद्याचा साठा ठेवण्यात आला होत्या. त्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.

    follow whatsapp