Rahul Gandhi Press Conference: मुंबई: लोकसभेतील (Lok Sabha) अविश्वास प्रस्तावावर (No-Confidence Motion) काल (10 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींनी (PM Modi) अत्यंत दीर्घ असं भाषण केलं. या भाषणादरम्यान, मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ज्यानंतर आज (11 ऑगस्ट) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. मोदींनी आपल्या भाषणादरम्यान हास्य-विनोद केले, त्यांना मणिपूरबाबत काहीही घेणंदेणं नाही.. अशा स्वरुपाचे अत्यंत गंभीर असे आरोप राहुल गांधींनी यावेळी केले आहेत. (rahul gandhi attacked on pm modi about manipur violence said manipur was burning and modi was laughing in the parliament)
ADVERTISEMENT
पाहा पत्रकार परिषदेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले:
‘मणिपूर जळत होतं अन् मोदी लोकसभेत हसत होते..’
‘काल पंतप्रधान मोदींनी 2 तास 13 मिनिटं भाषण केलं. त्यात शेवटी त्यांनी दोन मिनिटं मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं. मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून आग लागली आहे. लोकं मारली जात आहेत, बलात्कार होत आहे, लहान मुलांना मारलं जात आहे. पण काल पाहिलं असेल की, पंतप्रधान हसून-हसून बोलत होते.. हसत होते. जोक मारत होते.. हे वागणं त्यांना शोभा देत नाही.’
‘जर या देशात हिंसा होत असेल तर भारताचे पंतप्रधानाने दोन तास मजाक उडवता कामा नये. विषय काँग्रेस नव्हता, विषय मी नव्हतो.. विषय हा मणिपूर होता.. मणिपूरमध्ये काय होतंय.. आणि त्याला एकदम का रोखलं जात नाहीए? हा विषय आहे.’
‘मी मला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो.. मी आतापर्यंत बोललो नाही.. मला हे आधीच बोलायला हवं होतं. मी 19 झाली राजकारणात आहे. मी आतापर्यंत प्रत्येक राज्यात गेलो आहे. पूर, त्सुनामी, वादळं आली.. हिंसा झाली की, त्या भागात आम्ही जातो. 19 वर्षांच्या अनुभवात जे मी मणिपूरमध्ये पाहिलं आणि ऐकलं ते मी याआधी कधीही ऐकलं नव्हतं. मी संसदेत म्हटलं की, पंतप्रधान आणि अमित शाह यांनी भारतमातेची हत्या केली आहे.’
हे ही वाचा >> Nawab Malik Bail : सुप्रीम कोर्टात मलिकांना अखेर दिलासा, पण तात्पुरता
‘मणिपूरमध्ये भारताला संपवलंय.. असं मी नाही म्हटलेलं.. हे पोकळ शब्द नाहीत.. मी आपल्याला सांगतो की, मी असं का बोललो… मी जेव्हा मणिपूरला पोहचलो.. जेव्हा आम्ही मैतई लोकांच्या परिसरात गेलो.. तेव्हा आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, जर आपल्या सुरक्षाव्यवस्थेत जर कोणीही कुकी असेल तर त्याला इथे घेऊन येऊ नका.. नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू..’
‘जेव्हा कुकी लोकांच्या परिसरात गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, जर कोणीही मैतई आपल्या सुरक्षाव्यवस्थेत असेल तर त्याला इथे घेऊन येऊ नका.. आम्ही त्याला गोळी मारू..’
‘आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला मैतईंना दूर ठेवावं लागलं.. आम्हाला कुकींना दूर ठेवावं लागलं. म्हणजे मणिपूर आज घडीला एक राज्य नाहीए.. आज मणिपूर हे दोन राज्य आहेत. राज्याची हत्या करण्यात आली आहे आणि त्याला चिरलं आहे.. यासाठीच मी म्हटलं की, मणिपूरमध्ये भारताची हत्या भाजपने केली आहे.’
‘जेव्हा काल मी पंतप्रधानांना पाहिलं.. हसताना, हास्यविनोद करताना.. मी समजू शकत नव्हतो की भारताचे पंतप्रधान अशाप्रकारे कसं काय बोलू शकतात?, पंतप्रधान हे समजत नाही का? की, देशात काय चाललं आहे..’ अशा शब्दात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला..
‘लष्कर मणिपूरमधील तमाशा दोन दिवसात बंद करेल’
‘चला, सोडून द्या.. त्यांना तिथे जायचं नाही.. त्याचीही कारणं आहेत. जे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुम्ही जाऊ शकत नाही.. तर किमान मणिपूरबाबत बोला तरी. भारताचं लष्कर.. जे मणिपूरमध्ये सुरू आहे ते भारताचं लष्कर दोन दिवसात रोखू शकतात. तिसरा दिवसही उजाडणार नाही.. जर लष्कराला सांगण्यात आलं की, हा तमाशा बंद करा.. तर दोन दिवसात हा तमाशा बंद होईल.’
‘पंतप्रधान मोदी मणिपूरला जाळू इच्छितात.. त्यांना तिथली आग विझवायची नाही.. हे आहे सत्य…’ असं मोदी म्हणाले..
मोदींवर चढवला हल्ला..
‘भाषण हे भारताबाबत नव्हतं.. तर भाषण हे नरेंद्र मोदींवरच होतं. ते आपली मतं, आपलं राजकारण, आपल्या महत्त्वाकांक्षा ते आपल्याला सांगत होते. प्रश्न हा नाहीए की, नरेंद्र मोदी हे 2024 मध्ये पंतप्रधान बनणार की नाही.. प्रश्न हा आहे की, मणिपूर जळतो आहे.. महिलांवर बलात्कार होतोय.. लोकं मारली जात आहेत.’
‘जर पंतप्रधानांना काही बोलायचं आहे तर त्यांनी त्या गोष्टी जाहीर सभेत बोलाव्यात, हास्यविनोद करायचे आहेत तर मणिपूर जळत नसताना करावेत.. पण पंतप्रधानांना ही गोष्ट समजली पाहिजे की, संसदेत जी चर्चा सुरू होती ती त्यांच्याबाबत नव्हती तर मणिपूरविषयी होती.’
‘मला पंतप्रधानांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मी फक्त हे म्हणतोय की, एका राज्याची हत्या करण्यात आली आहे. भारतमातेची हत्या केलीए मणिपूरमध्ये.. आणि पंतप्रधान सभागृहात हसत आहेत, घोषणाबाजी करतायेत मला काय उत्तर देण्याची गरज आहे..’ अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.
‘मणिपूर जळत राहावं असं अमित शाहांना वाटतं?’
‘मणिपूरमध्ये जे हजारो शस्त्र जे लुटले गेले.. ती घटना मणिपूरचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच सरकारमध्ये घडली. तर अमित शाह यांना हेच हवं होतं का की हजारो शस्त्रं लुटली जावी? जी हिंसा सुरू आहे.. तर अमित शाह यांना वाटतं का हिंसा सुरूच राहावी?’
हे ही वाचा >> ‘…त्यावेळी गिरीश महाजन हाफ पँटवर फिरायचे’; एकनाथ खडसे का भडकले?
‘मुख्यमंत्री हिंसा रोखू शकत नाही.. अमित शाह म्हणतात मुख्यमंत्री आमचे ऐकत आहेत. तर याचा अर्थ तुम्हाला मणिपूर जळत राहावं असंच वाटतंय?’ असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
‘मोदींना टीव्हीवर माझा चेहरा पाहायला आवडत नसेल, म्हणून…’
‘खासदारांना काढा किंवा परत आणा.. त्याने आमचं काम थांबणार नाही.. आमचं लक्ष्य हेच आहे की, जे मणिपूरमध्ये सुरू आहे ते थांबवणं. जी काही शस्त्रं आमच्या हातात आहेत ती हिंसा थांबविण्यासाठी त्याचा आम्ही प्रयोग करू.’
‘माहित नाही.. पंतप्रधांनाना माझा चेहरा पाहायचा नसेल.. पण पंतप्रधान माझ्या व्हिडीओबाबत बोलतात. मला वाटतं की, त्यांना माझा चेहरा टीव्हीवर पाहणं आवडत नसेल. काही हरकत नाही.. मला माझं काम करायचं आहे. मला माहिती आहे की, मीडियावर नियंत्रण आहे, लोकसभा-राज्यसभा टीव्हीवर नियंत्रण आहे.. त्याबाबत मी काही फार करू शकत नाही. पण मला माझं काम करायंचं आहे आणि मी करत राहीन.. जिथेही भारतमातेवर आक्रमण होईल तिथे मी उभा असेन भारतमातेच्या संरक्षणासाठी..’ असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या कालच्या सभागृहातील भाषणाचा समाचार घेतला.
ADVERTISEMENT