Badlapur News: '...आता आंदोलन करावं लागणार का?' बदलापूरच्या घटनेवर राहुल गांधींचं मोठं ट्वीट

मुंबई तक

21 Aug 2024 (अपडेटेड: 21 Aug 2024, 07:02 PM)

Rahul Gandhi Tweet On Badlapur Incident : पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातील मुलींवर झालेली अत्याचाराची घटना निंदनीय आहे. आपण सामजिक जीवनात कुठे जात आहोत? असा प्रश्न या घटनेमुळं उपस्थित झाला आहे. जनता जोपर्यंत रस्त्यावर उतरली नाही, तोपर्यंत बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलींना न्याय देण्याचा विचार केला नाही.

Rahul Gandhi Tweet On Badlapur Incident

Rahul Gandhi Tweet On Badlapur Incident

follow google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरच्या घटनेमुळं राहुल गांधी संतापले

point

राहुल गांधी ट्वीटरवर नेमकं काय म्हणाले?

point

राहुल गांधींनी विरोधकांना दिला इशारा

Rahul Gandhi Tweet On Badlapur Incident : पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातील मुलींवर झालेली अत्याचाराची घटना निंदनीय आहे. आपण सामजिक जीवनात कुठे जात आहोत? असा प्रश्न या घटनेमुळं उपस्थित झाला आहे. जनता जोपर्यंत रस्त्यावर उतरली नाही, तोपर्यंत बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलींना न्याय देण्याचा विचार केला नाही. आता गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करावं लागणार का? पीडितांना पोलिस स्टेशनपर्यंत जाणंही इतकं कठीण झालं आहे का? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरवर उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

राहुल गांधी ट्वीटरवर काय म्हणाले?

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातील मुलींवर झालेली अत्याचाराची घटना निंदनीय आहे. आपण सामजिक जीवनात कुठे जात आहोत? असा प्रश्न या घटनेमुळं उपस्थित झाला आहे. जनता जोपर्यंत रस्त्यावर उतरली नाही, तोपर्यंत बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलींना न्याय देण्याचा विचार केला नाही. आता गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करावं लागणार का? पीडितांना पोलिस स्टेशनपर्यंत जाणंही इतकं कठीण झालं आहे का?

न्याय देण्याऐवजी गुन्हा लपवण्याचा अधिक प्रयत्न केला जातो. महिला आणि कमकुवत लोक याच गोष्टींना बळी पडतात. गुन्हा दाखल न झाल्यानं पीडितांवर अन्याय तर होतोच, पण गुन्हेगारांचं मनोबलही वाढतं. महिलांना सुरक्षित राहता यावं, यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत, याचा विचार सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गंभीर्यानं केला पाहिजे. न्याय प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्याला पोलीस आणि प्रशासनाच्या मर्जीनं चालवलं जाऊ शकत नाही

    follow whatsapp