Raj Thackeray on Sharad Pawar : इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेतून राज ठाकरेंनी शरद पवार, उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. ''राष्ट्रवादी सूरू झाल्यापासून जर तुम्ही शरद पवारांचा राजकारण पाहिलत तर दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण केलाय'', अशी गंभीर टीका राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली आहे. (raj thackeray criticize sharad pawar on maratha reservation chhatrapati sambhaji nagar maharashtra politics)
ADVERTISEMENT
''शरद पवारांसारखा 82, 83 वर्षाचा माणूस विधान करतो की महाराष्ट्राचं मणिपूर होईल. म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये, याची चिंता केली पाहिजे. पण ते म्हणतायत मणिपूर होईल, म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे, हे तुम्हाला कळलंच असेल. पुढच्या तीन, साडेतीन महिन्यात यांना जेवढ्या काही दंगली घडवता येतील, खासकरून मराठवाड्यात यासाठी यांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राज ठाकरेंनी पवारांवर केला.
हे ही वाचा : Shiv Sena : "ठाकरेंनी रॅण्ड घोटाळ्यातील गुप्ताची घेतली भेट", शिंदेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राज ठाकरे पुढे म्हणाले, राष्ट्रवादीची सुरुवात झाल्यापासून जर शरद पवारांच राजकारण पाहिलं तर दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे त्यांनी सुरू केलंय, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. त्यादिवशी मोबाईलवरती क्लिप पाहिली. लहान लहान मुली बोलत होत्या आम्ही ओबीसी समाजातल्या आणि मैत्रिणी मराठा समाजातल्या, पण या सगळ्या वातावरणामुळे त्या सगळ्या दुर झाल्या. इतक्या खालच्या पातळीवर आणलंत राजकारण, का तुम्हाला सत्तेत यायचं म्हणून,राजकारण करायचं म्हणून, असा हल्ला देखील राज ठाकरेंनी पवारांवर चढवला.
माझ्या दौऱ्यात यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, उद्या माझं वादळ उठलं तर यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभो, माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ना कळणार पण नाही.नंतर घरी आल्यावर आरशात पाठ आणि पोट बघावं लागेल आणि गाल पण बघावे लागतील, असा इशारा राज ठाकरे यांनी पवार, ठाकरेंना दिला.
मराठा आरक्षणावरून घेरलं
मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा मुंबईत निघाला होता. ज्या ठिकाणी मोर्चा अडवला तिकडे व्यासपीठावर भाजपची, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेची लोकं होती. सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे एकमूखाने मागणी केली होती. जर तुमच्या सगळ्यांचं एकमत आहे, तर तुम्हाला अडवलं कुणी? असा सवाल देखील राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
हे ही वाचा : Sanjay Raut : "सुपाऱ्या फेकणारे 100 टक्के शिवसैनिक असतील, पण...", राऊतांचा खुलासा
गेली 10 वर्ष मोदी केंद्रात पंतप्रधान आहेत, आता तिसरी टर्म सूरू आहे. ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीत येऊन सांगितलं होतं मी शरद पवारांचा बोट पकडून राजकारणात आलो. मग त्या पवारांनी मोदींपुढे मराठा आरक्षणाचा शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात नांदत होते ना, मग मराठा आरक्षणासाठी यांनी शब्द का नाही टाकला? आता जरांगेच्या मागून यांचं मतं मिळवण्यासाठी राजकारण सुरू आहे, अशी टीका देखील राज ठाकरे यांनी केली.
ADVERTISEMENT