Raj Thackeray : लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं, शिंदे, अजित पवारांना काय म्हणाले?

ऋत्विक भालेकर

25 Jul 2024 (अपडेटेड: 25 Jul 2024, 02:20 PM)

Raj Thackeray News : मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यातून बोलताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवरून टोलेबाजी केली.

 raj thackeray reaction on mukhymantri majhi ladaki bahin yojana criticize eknath shinde ajit pawar

मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला

point

लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवरून टोलेबाजी

point

 मी सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी ४ ते ५ सदस्य नेमले होते.

Raj Thackray on Ladaki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारने 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (mukhymantri majhi ladaki bahin yojana) ही योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला घेरलं आहे. ''खड्डे बुजवायला पैसै नाहीयेत, मग लाडकी बहीण आणि लाडक्या भावासाठी कुठून पैसे आणणार'' असा सवाल राज ठाकरेंनी महायुती सरकारला केला आहे. (raj thackeray reaction on mukhymantri majhi ladaki bahin yojana criticize eknath shinde ajit pawar) 

हे वाचलं का?

मुंबईत आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यातून बोलताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवरून टोलेबाजी केली. लाडका भाऊ आणि  लाडकी बहीण दोघेही एकत्र आनंदी असते तर (राष्ट्रवादी) पक्ष फुटला नसता,असा टोला राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना लगावला आहे. त्याचबरोबर खड्डे बुजवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही आणि ‘लाडकी बहीण’ आणि   'लाडका भाऊ’साठी पैसे कुठून आणणार? असा सवाल राज ठाकरेंनी महायुती सरकारला केला आहे. 

मनसे विधानसभेच्या किती जागा लढणार? 

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा अशा मनोवृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीला तिकीट दिले जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे. 

हे ही वाचा : Mumbai-Pune Weather Update: मुंबई-पुण्यात पावसाचा कहर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

आजकाल सर्वेक्षणांचा ट्रेंड आहे. त्यामुळे  मी सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी ४ ते ५ सदस्य नेमले होते. त्यांनी या भागातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि पत्रकारांशी संवाद साधला. आता ही टीम तुमच्याशी बोलण्यासाठी पुन्हा दुसऱ्या फेरीसाठी येईल. त्यांना मतदारसंघातली मूळ परिस्थिती समजावून सांगा. काय गोष्टी होऊ शकतात, याचा विचार करा. मी पाठवलेल्या मनसेच्या पथकांना योग्य माहिती द्या. त्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील का, असा कोणताही विचार मनात आणू नका. पण आपण विधानसभेच्या जवळपास 225 ते 250 जागा आपण लढवणार आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. 

दरम्यान मनसे सोडण्याच्या तयारी असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी भाष्य केले. मी विधानसभा निवडणुकीसाठी आमदारांची यादी बघत होतो. कोण कुठल्या पक्षात आहे, हेच कळत नाही. आपल्यातील काही लोकही जाण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा आहे. मी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालेन, त्यांनी खुशाल दुसऱ्या पक्षात जावे आणि स्वत:चे नुकसान करुन घ्यावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

तसेच मी 1 ऑगस्टपासून माझा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहे. मी तुम्हा सर्वांना भेटेन आणि तुमच्याशी सविस्तर चर्चा करेन, असे देखील राज ठाकरे यांनी सांगितले आहे. 

    follow whatsapp