Markadwadi BJP Sabha : जिथे पवारांची सभा झाली, तिथेच भाजपची सभा, गावभर होर्डिंग्ज; "फेक नरेटीव्ह विरुद्ध...

मुंबई तक

10 Dec 2024 (अपडेटेड: 10 Dec 2024, 09:18 AM)

EVM वर झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा करत या गावातील लोकांनी बॅलेटवर मॉकपोल घेण्याची तयारी केली होती. त्यानंतर या गावात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भेटी दिल्या, अगदी विधानसभेच्या विशेष अधिवेशनातही या गावासाठी विरोधकांनी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आज भाजपही इथे सभा घेणार आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

"फेक नरेटीव्ह विरूद्ध जाहीर सभा"

point

राम सातपुते घेणार मारकडवाडीत सभा

point

गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतही राहणार उपस्थित

Ram Satpute BJP Sabha Markadwadi : सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात असलेल्या मारकडवाडी या गावाचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पोहोचलं आहे. EVM वर झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा करत या गावातील लोकांनी बॅलेटवर मॉकपोल घेण्याची तयारी केली होती. त्यानंतर या गावात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भेटी दिल्या, अगदी विधानसभेच्या विशेष अधिवेशनातही या गावासाठी विरोधकांनी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार, जयंत पाटील यांनी या गावात जाऊन लोकांशी संवाद साधला. राहुल गांधीही या गावात येणार असल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता आज विरोधकांच्या आरोपांना उत्तर म्हणून भाजप नेते राम सातपुते, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे सभा घेणार आहेत. 

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी या गावात शरद पवार यांनी सभा घेतली होती. या सभेतून देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत तुम्ही या गावात येऊन लोकांचं म्हणणं ऐकून घ्या असं म्हटलं आहे. त्यानंतर भाजपने आता फेक नरेटीव्ह तयार केल्या जात असल्याचा आरोप करत आज त्याच मारकडवाडी गावात ही सभा आयोजित केली आहे. त्यामुळे मारकडवाडी गावातलं वातावरण काहीसं तापलेलं पाहायला मिळतं आहे. 

हे ही वाचा >> Kurla Best Bus Accident : भरधाव BEST बस मार्केटमध्ये घुसली, लोकांना चिरडलं, पाच जणांचा मृत्यू, 30 जखमी

मारकडवाडीमध्ये आजच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा भेट देणार आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर्सही लागले आहेत. राम सातपुते, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या भले मोठे होर्डिंग्स इथे लागले आहेत. तसंच दुसरीकडे काही दिवसांपूर्वी झालेल्या शरद पवार यांच्या सभेचे आणि नाना पटोले यांचेही बॅनर्स या गावात आता पाहायला मिळत आहेत.

पवारांच्या सभेनंतर सातपुतेंनी केले होते आरोप

हे ही वाचा >>Mumbai Kurla BEST Bus Accident : अपघातग्रस्त BEST बस चालक 9 दिवसाआधीच नोकरीला लागला? तपासात धक्कादाय माहिती उघड

शरद पवार मारकडवाडीमध्ये आले असताना, मोहितेंच्या गावगुंडांनी, कारखान्याचे कामगार घेऊन जात मारकडवाडीच्या ग्रामस्थांना धमक्या दिल्या. जिंकले तर लोकशाही जिंकली म्हणायचं आणि हारले तर EVM मुळे हारले असं म्हणण्याचा प्रकार पवारांकडून होत आला आहे. तसंच मोहिते पाटलांशी संघर्ष करायला आम्ही तयार आहे असं सातपुते म्हणाले. कधीही निवडणूक लागू करण्याची तयारी दाखवावी, प्रशासनाने जर निवडणूक आयोजित केली, तर आम्ही जशी म्हणाल तशी निवडणूक लढायला तयार आहे असं राम सातपुते म्हणाले. उत्तम जानकरांनी राजीनामा द्यावा, मी त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारतो, ते म्हणाले हात वर करुन जरी निवडणूक घ्यायची असेल तरी मी तयार आहे असं सातपुते म्हणाले. उत्तम जानकर हा प्यादा असून, रणजितसिंह मोहिते खरे मास्टरमाईंड आहेत असं राम सातपुते म्हणाले. मारकडवाडीमध्ये आम्ही मोठी सभा घेऊ असं तेव्हाच राम सातपुतेंनी सांगितलं होतं. 

    follow whatsapp