Maharashtra Elections 2024: कोणाच्या गाडीत सापडले 5 कोटी? रोहित पवारांनी थेट टाकला Video

Rohit Pawar Viral Video : राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार असून निवडणूक आयोगाने राज्यभरात आचारसंहिता लागू केली आहे. अशातच पुण्याजवळील खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका कारमध्ये 5 कोटींची रक्कम सापडलीय.

Rohit Pawar Tweet On 5 Crore Seized Cash

Election Commission Seized 5 Crore in The Car

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 03:48 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आचारसंहिता लागू असताना 'त्या' कारमध्ये सापडले 5 कोटी रुपये

point

"महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं"

point

आमदार शहाजी बापूंनी केला मोठा खुलासा

5 Crore Cash Seized Near Pune, Maharashtra Elections 2024 : राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार असून निवडणूक आयोगाने राज्यभरात आचारसंहिता लागू केली आहे. अशातच पुण्याजवळील खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका कारमध्ये 5 कोटींची रक्कम सापडलीय. या घटनेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले, असं म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी कारमध्ये सापडलेल्या 5 कोटी रुपयांचा व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 

हे वाचलं का?

रोहित पवार ट्वीटरवर काय म्हणाले? 

"सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगर झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत ?लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु,इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला  कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ओके करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!"

हे ही वाचा >> Sanju Samson: "T20 वर्ल्डकपची फायनल खेळणार होतो, पण रोहितने...", संजूने उडवली खळबळ

गाडी माझी पण पैसे माझे नाहीत - अमोल नलावडे 

खेड शिवापूर येथे  कारमध्ये पाच कोटी रुपये सापडल्याची घटना घडली. ही गाडी सांगोला तालुक्यातील अमोल नलावडे या व्यक्तीच्या नावावर असून यात शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अमोल नलावडे म्हणाले, "गाडी माझीच आहे. मात्र ती गाडी मी विकली आहे. त्या गाडीचे पैसे देखील मला ऑनलाईन आले आहेत. मात्र गाडीची कागदपत्र नावावर करायची राहून गेली आहेत. मी एक व्यापारी आहे आणि त्या गाडीची आणि त्यातील पैशाशी माझा काहीही संबंध नाही. कोणतीही पोलीस चौकशी किंवा आयकर विभागाची चौकशी असेल, तर मी त्याला सामोरं जायला तयार आहे.  

हे ही वाचा >>  Viral Video : 'मुन्नी बदनाम गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स'; 'IIT Bombay' चा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

आमदार शहाजी बापू पाटील यांचा खुलासा

खेड शिवापुर येथे कारमध्ये सापडलेल्या पाच कोटी रक्कमेबाबत आमदार शहाजी बापू पाटील यांनी खुलासा केला आहे. ती गाडी माझी किंवा माझ्या कुटुंबातील नसून त्यात आमचा काहीही संबंध नाही, असं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, संजय राऊत यांना दिवसा रात्री आम्हीच दिसतोय. आम्ही बंड यशस्वी केला तेव्हापासून संजय राऊत हे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. गाडी ज्या व्यक्तीची आहे, तो अमोल नलावडे हा नक्की कोणत्या पक्षाचा आहे हे सांगू शकत नाही.

    follow whatsapp