Nagpur Violence: औरंगजेबच्या कबरीबाबत RSS मोठं विधान, सर्वांच्या भुवया उंचावल्या

Sunil Ambekar On Nagpur Voilence : राज्यात नागपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही गंभीर घटना घडली

RSS Sunil Ambekar On Nagpur Violence

RSS Sunil Ambekar On Nagpur Violence

मुंबई तक

19 Mar 2025 (अपडेटेड: 19 Mar 2025, 09:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवर सनील आंबेकरांची मोठी प्रतिक्रिया

point

"आज औरंगजेबचा मुद्दा संयुक्तिक नाही. समाजिक सलोखा.."

point

सुनील आंबेकर नेमकं काय म्हणाले?

Sunil Ambekar On Nagpur Voilence : राज्यात नागपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही गंभीर घटना घडलीय. याच नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. दरम्यान, नागपुरात दोन गटाने निर्माण केलेल्या हिंसाचारावरून भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी इंडिया टुडेशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. 'आज औरंगजेबचा मुद्दा संयुक्तिक नाही. समाजिक सलोखा उत्तम ठेवण्यासाठी कुठलाही हिंसाचार हा चांगला नाही', असं आंबेकर यांनी म्हटलंय.

हे वाचलं का?

'औरंगजेब संयुक्तिक आहे? आणि औरंगजेबची कबर हटवली पाहिजे का?' असे सवाल सुनिल आंबेकर यांना विचारण्यात आले. या प्रश्नाचं उत्तर देताना आंबेकर म्हणाले, "औरंगजेब संयुक्तिक नाहीय. आजच्या घडीला मुघल मुघल बादशाह संयुक्तिक नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन दिलं जाऊ शकत नाही. आरएसएसचा चेहरा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. नागपूरमध्ये झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळं हिंसाचार उसळला".

नागपूरच्या हिंसाचाराच्या घटनेत 34 पोलीस कर्मचारी जखमी

नागपूरमध्ये 17 मार्चला हिंसाचाराची घटना घडली. येथील महल परिसरात दोन गटात तुफान राडा झाल्यानं जोरदार दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. या गंभीर प्रकारामुळे नागपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन्ही गटाकडून जाळपोळ करण्यात आल्यानं अनेक घरांची तोडफोड झाली होती. या हिंसाचाराच्या घटनेमुळं 34 पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी तातडीनं कारवाईचा बडगा उगारून परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे ही वाचा >> Crime: नवरा घरी नसताना बॉयफ्रेंडने लावली 'नको ती' सवय, मुस्कानच्या आई-वडिलांनी सगळंच सांगितलं

दरम्यान, याप्रकरणी 5 एफआयआरची नोंद झाली असून 51 लोकांना अटक करण्यात आलीय. जखमी पोलिसांमध्ये 3 डिसीपी रँकचे अधिकारी आहेत. उपचार झाल्यानंतर अनेक पोलिसांनी ड्युटी जॉईन केली आहे. नागपूरमध्ये अजूनही 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्फ्यू जारी आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांबाबतही नागपूर पोलिसांकडून तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, "नागपूरच्या हिंसेची घटना पूर्वनियोजित वाटते. लोकांनी काही महत्त्वाच्या ठिकाणांना निशाणा बनवला. छावा चित्रपटामुळे औरंजेबविरोधी भावना लोकांमध्ये जागृत झाल्या आहेत. त्यानंतर (चित्रपटानंतर) लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.

हे ही वाचा >> Nagpur Violence Mastermind: नागपूर हिंसाचार घडवणाऱ्या 'नेत्याला' निवडणुकीत मिळालेली 'एवढी' मतं

औरंगजेबविरोधात प्रचंड राग निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असल्यासारखा वाटतोय. काही लोकांनी आधीच या घटनेचा कट रचला होता. सोमवारी सकाळी 11.30 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली होती. त्यांनी प्रतिकात्मक कबरीला आगही लावली होती. त्यानंतर गणेश पेठ पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला".

    follow whatsapp