Salman Khan : खोटे सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवल्याचा आरोप; भर कार्यक्रमात काढला शर्ट अन्…

मुंबई तक

• 11:26 AM • 11 Apr 2023

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. चाहते सलमानच्या चित्रपटाचा ट्रेलर मास ओरिएंटेड असल्याचे सांगत आहेत.

Salman Khan took off his shirt in the event after many people are trolling him for his six pack abs

Salman Khan took off his shirt in the event after many people are trolling him for his six pack abs

follow google news

Salman Khan :

हे वाचलं का?

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) भर कार्यक्रमात शर्ट काढल्याचा एक फोटो चांगलाच व्हायरल होतं आहे. त्याने नेमका शर्ट का काढला असा सवाल विचारला जात होता. आता अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. त्याचं झालं असं की, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. चाहते सलमानच्या चित्रपटाचा ट्रेलर मास ओरिएंटेड असल्याचे सांगत आहेत. (Salman Khan took off his shirt in the event after many people are trolling him for his six pack abs)

याच सर्व चांगल्या गोष्टींमध्ये एका कार्यक्रमात माशी शिंकली. सलमानचा एखादा चित्रपट आला की त्याला त्याच्या सिक्स पॅक अ‍ॅब्सबद्दल वारंवार प्रश्न विचारले जातात. अनेक लोक सोशल मिडीयावर त्याला ट्रोल करत असल्याचं दिसून येत. सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर केले जातात. सलमानचे सिक्स पॅक अ‍ॅब्स हे खरे नसून ते VFX तंत्रज्ञानामुळे दिसतात, असा आरोप त्याच्यावर केला जातो.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कोर्टात का माफी मागितली? काय आहे प्रकरण?

सलमानला याच कार्यक्रमादरम्यान या सिक्स पॅक अ‍ॅब्जबद्दल आणि त्याच्या सत्यतेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. आता दबंग खान स्वतःवरच हा आरोप कसा सहन करेल? ही गोष्ट सलमानला आवडली नाही आणि त्याने कार्यक्रमाच्या मध्यभागी आपला शर्ट काढला. स्वतःला सिद्ध करत त्याने उपस्थितांना दाखवून दिलं की त्याचे चित्रपटात दिसणारी त्याची तंदुरुस्त शरीरयष्टी VFX नसून त्याची स्वतःची मेहनत आहे. शर्ट काढत सलमानने मीडियाकडे पाहिले आणि म्हणाला, “तुमको लगता है VFX से ऐसा होता है”

Rakhi Sawant – मिका सिंगमधील वाद मिटला? 17 वर्षांपूर्वीचं ‘किस’ प्रकरण पुन्हा चर्चेत

सलमान किती फिटनेस फ्रीक आहे हे त्याच्या सगळ्या चाहत्यांना माहित आहे. त्याने मेहनतीने बॉडी आणि अ‍ॅब्स बनवले आहेत. त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट देखील याचा पुरावा देतात. नुकताच सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक शर्टलेस फोटो शेअर केला होता. कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं होतं की, May look like it but definitely not chilling. त्याच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

    follow whatsapp