Sanjay Raut : 20 ला निवडणूक, 23 ला निकाल, तर 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट? राऊतांचा थेट शाहांवर निशाणा

मुंबई तक

20 Oct 2024 (अपडेटेड: 20 Oct 2024, 11:26 AM)

Sanjay Raut on BJP : लोकशाहीतील सर्वात मोठा घोटाळा भाजपने केला असून, अमित शाह याचे सूत्रधार आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे आम्ही गरज पडल्यास निवडणूक आयोगावर चाल करून जाऊ असंही संजय राऊत यांनी सांगितलंय.

संजय राऊत यांचे आरोप

संजय राऊत यांचे आरोप

follow google news

बातम्या हायलाइट

point

मतदार याद्यांमध्ये घोटाळे

point

150 मतदारसंघांमध्ये 10 हजार नावं काढली

point

अमित शाहांना राष्ट्रपती राजवट लावायची आहे : राऊत

Sanjay Raut on BJP मुंबई : संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि निवडणूक आयोगावर खळबळजनक आरोप केला आहे. भाजप लढत असलेल्या 150 मतदारसंघांमध्ये 10 हजार मतदारसंघांमध्ये मतदारांची नावं डिलिट करून त्याऐवजी बोगस नावं टाकण्याचा प्रकार केला आहे असा आरोप केला. तसंच हा लोकशाहीतील सर्वात मोठा घोटाळा असून, अमित शाह याचे सूत्रधार आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे आम्ही गरज पडल्यास निवडणूक आयोगावर चाल करून जाऊ असं राऊत म्हणाले. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायचं षडयंत्र भाजप रचत असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut Allegations on BJP and election Commission for upcoming Vidhan Sabha Elections)

हे वाचलं का?

जागतिक स्तरावर हा मुद्दा उचलून लोकशाहीची कशी हत्या होतेय, हे आम्ही दाखवू असं म्हणत राऊत यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय. लोकसभेला आम्ही जसा भाजपचा पराभव केला, तसाच आम्ही विधानसभेलाही पराभव करू शकतो असं राऊत म्हणाले. भाजपविरोधात जनता गेल्यानं निवडणूक आयोगाला हाताशी धरुन ते आता मतदार याद्यांमध्ये घोटाळे करत आहेत. भाजप लढत असलेल्या 150 मतदारसंघांमध्ये 10 हजार नावं काढून त्याऐवजी बोगस नावं टाकली जात आहेत. यामधून शिंदे आणि अजित पवार जिथे लढणार आहेत त्यामध्ये हे केलं जाणार नाहीये असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election : वंचितची चौथी यादी जाहीर, 'या' 16 जणांना दिली उमेदवारी

देशात लोकशाही राहिली नसून, निवडणूक आयोग गृहमंत्रालयाच्या अखत्यारित आहे की काय असा सवालही त्यांनी केला. या घोटाळ्यातील एका सुत्रधाराला आता राज्यपाल नियुक्त आमदारही केलं असं संजय राऊत म्हणाले आहे. तसंच हा घोटाळा कसा करावा यासाठी बावनकुळेंनी नागपुरात एक शिबिरही घेतलं असं राऊत म्हणाले. 

अमित शाहांना राष्ट्रपती राजवट लावायची आहे : राऊत 

हे ही वाचा >> Shiv Sena : CM शिंदेंच्या 10 आमदारांचा पत्ता होणार कट? कोणत्या आमदारांची नावं?

23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, आणि 26 नोव्हेंबरला सरकार स्थापन करावं लागेल. त्यामुळे फक्त 48 तासात सरकार स्थापन करावं लागेल. आमदारांना एकत्र करणं, नेता निवडीचे सोपस्कार करणं हे सर्व शक्य न झाल्यास 26 तारखेला विधानसभेचा कालावधी संपेल आणि अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील अशी शक्यता व्यक्त केली गेली. 
 

    follow whatsapp