Bharat Gogawale MLa Disqualification Sanjay Raut : “शिवाजी महाराज तिकडे गेले होते म्हणून मला वाटले चांगले ठिकाण असेल म्हणून मी तिकडे गेलो”, असं उत्तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सुरतला जाण्याबद्दलच्या प्रश्नावर दिलं. त्यावरूनच आता विरोधकांनी खडेबोल सुनावले आहेत. खासदार संजय राऊतांनी गुवाहाटी जाण्यावरून खडेबोल सुनावले, तर हे शिवाजी महाराजांशी तुलना करण्याच्या लायकीचे नाहीत, असे नाना पटोले म्हणाले.
ADVERTISEMENT
गोगावलेंच्या विधाना संजय राऊत म्हणतात…
“छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते, ते ब्रिटिश आणि ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी. तुम्ही तर महाराष्ट्र लुटायला तिथे गेलात. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते”, असे संजय राऊत म्हणाले.
शिवाजी महाराजांचा अपमान -नाना पटोले
“छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन, घोषणा देऊन हे सत्तेत येतात; पण सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान कसा करायचा हे त्याला विसरत नाही”, असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >> “मंत्री केलं नाही म्हणून उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला?”
“छत्रपती शिवाजी महाराज गुजरातमधील सुरतमध्ये घेण्यासाठी नव्हते गेले. तिथे अत्याचारी व्यवस्था होती. त्या अत्याचारी व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी आणि त्यांनी जो आपल्या लोकांचा खजाना लुटला होता, तो परत आणण्यासाठी गेले होते. तो इतिहास त्यांना माहिती नाही म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे”, अशा शब्दात पटोलेंनी टोला लगावला.
“तुम्ही गुजरातच्या गुलामगिरीमध्ये गेला होता. गुजरातच्या गुलामीमध्ये तुम्हाला त्या हॉटेलमध्ये कसं कस्टडीत ठेवलं होतं. तुम्हाला कसं वागवलं होतं. एकनाथ शिंदेंचा त्या काळातील एक फोटो… तो सुरतमधीलच आहे. ते कसे हालत होते. हे शिवाजी महाराजांशी तुलना करण्याच्या लायकीचे नाहीत. यांनी करूही नाही, असा आमचा त्यांना सल्ला आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >> ‘दारू प्यायची तर प्या, पण…’; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना काय दिला सल्ला?
“शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. यांचे मंत्री पण… त्यावेळचे राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. यांच्या अर्ध्या डझनपेक्षा जास्त मंत्र्यांनी आणि देशातील प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. या सरकारने आमच्या महापुरुषांचा अपमान करण्याचा सपाटा लावला आहे”, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
बाळासाहेब थोरात काय बोलले?
“छत्रपती शिवाजी महाराजांचं जाणं आणि यांचं जाणं, यामध्ये काही फरक आहे की नाही? यावर फार भाष्य करून आपण महाराजांचं महत्त्व कमी करू नये. महाराजांचं जाणं स्वराज्यासाठी होतं. याचं जाणं वेगळ्या पद्धतीचं होतं”, असे खडेबोल बाळासाहेब थोरात यांनी सुनावले.
ADVERTISEMENT