आमच्या हातात सरकार द्या, 24 तासात मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत दाखल होतील, असे मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. आम्ही सामनामध्ये बातमी वाचू, ईडीच्या भयाने फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश, आता फडणवीसांना शिवसेनेत घ्यायचे की नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत. (sanjay raut criticize devendra fadnavis pm narendra modi amit shah on thackeray group statewide meeting worli)
ADVERTISEMENT
वरळीत उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचं राज्यव्यापी शिबीर पार पडतंय. या शिबिरात संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते. पाकिस्तान 3A चालवतात, अल्लाह, आर्मी आणि अमेरीका, आणि आपला देश सुद्धा तीन लोक चालवतात, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स. मोदी बिदी सगळं झुट आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच उद्या आमच्या हातात सरकार द्या, 24 तासात मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत दाखल होतील. आम्ही सामनामध्ये बातमी वाचणार ईडीच्या भयाने फडणवीसांचा शिवसेना प्रवेश, आता घ्यायेच की नाही हे उद्धव ठाकरे ठरवतील.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुढे शिंदे गटावरही टीका केली. त्यांच्या शिवसेनेचा 69 वा वर्धापण दिन, म्हणजे शिवसेनेच्या जन्माआधी यांची शिवसेना, तुम्हाला शिवसेनेच्या जन्माची तारीख माहित नाही, आणि शिवसेनेवर दावा सांगायला निघाला आहात,अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच निवडणूक आय़ोगाला खोके देऊन तारीख घेतली काय? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची!”, फडणवीसांना डिवचलं
संजय राऊतांनी ऐकवली कविता
संजय राऊत यांनी यावेळी एक कविता देखील ऐकवली. ”दो मस्ताने चले जिदंगी बनाने”, ”चुना लगाने पुरे देश डूबाने”, अशा कवितेच्या ओळी सांगुन त्यांनी याचा अर्थ सांगितला. हे दोन मस्ताने दिल्लीत आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील आहेत. हे दो मस्ताने महाराष्ट्र लुटतायत, डूबवतायत अशी टीका राऊत यांनी केली. यासोबतच नाशिक, बंगळूरू आणि देवास ही सरकारची नोटा छापण्याची कारखाने आहेत. या कारखान्यातील 88 हजार करोड रूपयाच्या नोटा बेपत्ता झाल्या आहेत. या छापलेल्या नोटांचे ट्रक गायब झाले आहेत. हे ट्रक गेलेत कुठे? महाराष्ट्रात जो खेळ झाला, त्यासाठी तर हे पैसै वापरले नाही, असा संशय देखील राऊत यांनी उपस्थित केला.
मोदी-शाहांवर टीका
अमित शहा, जे पी नड्डा सारखे अनेक नेते दिल्लीतून मुंबईत येऊन, मुंबईचा कब्जा करण्याच्या भाषा करतात. तुझ्या बापाचं आहे का? हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महापालिकेच्या निवडणूका घेऊन दाखवा, मग कब्जा घेण्याच्या भाषा करा, असे थेट आव्हानच राऊत यांनी भाजपला दिले आहे. तसेच निवडणूकीत नाही आस्मान दाखवलं,नाही छाताडावर पाय ठेवून भगवा झेंड़ा फडकवला तर बाळासाहेब ठाकरेंचे नाव सांगणार नाही, असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला.
सरकारला श्रद्धांजली वाहणार
महाराष्ट्रात सत्तासंघर्षावरीस सर्वोच्च न्यायालयाचा निकालावर बोलताना संजय राऊत यांनी संपूर्ण निकाल सांगितला. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं, एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे. भरत गोगावलेची प्रतोदपदी निवड बेकायदेशीर असून सुनील प्रभुंची निवड कायदेशीर आहे. गव्हर्नर कोश्याची यांचा होश्यारी असा उल्लेख करत त्याची कारवाई बेकायदेशीर आहे.सगळ बेकायदेशीर मग कायदेशीर काय? असा सवाल राऊत यांनी केला.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंनी वाचली यादी, राज्यव्यापी मेळाव्यात एकनाथ शिंदेंना घेरलं
सर्वोच्च न्यायालयाने सरकार डिसमीस केले आहे, फक्त त्याच्यावरती सही करायला महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाकडे पाठवले. म्हणजे एखाद्या खुन्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते, पण न्यायालय त्याला फाशी देत नाही, त्याच्यासाठी जल्लाद लागतो, असे देखील राऊत म्हणाले आहेत. आता या सरकारला फाशी दिली आहे, आणि त्याची बॉडी विधानसभेत पाठवली आहे. आता त्याला फाशी द्यायचे काम विधानसभा अध्यक्षांनी तत्काळ द्यायचे आहे. त्याना 90 दिवसांची मुदत, त्यातचे 40 दिवस झालेच. पुढच्या 50 दिवसात सरकारला श्रद्धांजली वाहायची, असे विधान करून संजय राऊत यांनी करून निलंबित आमदारांचा मुद्दा उचलला.
ADVERTISEMENT