Sanjay Raut: 'नमक हराम' हा चित्रपट मी काढणार आहे, संजय राऊतांनी कुणावर साधला निशाणा?

मुंबई तक

19 Aug 2024 (अपडेटेड: 19 Aug 2024, 02:17 PM)

Sanjay Raut On Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीला घाम फोडणाऱ्या महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकायला सुरुवात केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Sanjay Raut

Sanjay Raut

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

point

संभाजी भिडेंबाबत संजय राऊत काय म्हणाले? 

point

"एकनाथ शिंदेंच्या नादाला लागले आहेत, ते सगळे ढोंगी आहेत"

Sanjay Raut On Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि ठाकरे गटात राजकीय मैदानात जोरदार हल्लाबोल सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागले आहेत, ते सगळे ढोंगी आहेत. लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर काय होणार? एकनाथ शिंदे खोटं बोलत आहेत. पक्ष सोडताना राज ठाकरे आणि मी सोबतच होतो. एकनाथ शिंदे त्यावेळी ठाण्यात होते. त्यांना मुंबईत काही करता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना काय घडलं माहित नाही. शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झाले आहेत. 'नमक हराम' हा चित्रपट मी काढणार आहे. त्यावेळी सगळ्या पटकथा मी देणार आहे", असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. (Eknath Shinde has become more of a filmmaker these days. I am going to make the film 'Namak Haram'. Raut criticized Chief Minister Eknath Shinde by saying that I will give all the screenplays at that time.)

हे वाचलं का?

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला घाम फोडणाऱ्या महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकायला सुरुवात केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. राज्याची विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात जाहीर होईल, अशी चर्चा रंगू लागली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील निवडणुका डिसेंबर महिन्यात होत असतील तर ती राज्यकर्त्यांची सोय आहे. त्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते. त्यामुळे हा डाव टाकण्यात आला आहे. झारखंडची देखील निवडणूक हरियाणासोबत होण्यासाठी काही हरकत नव्हती. त्यांना झारखंडयेथील हेमंत सोरेन यांचा मुक्ती मोर्चा फोडायचा आहे. महाराष्ट्रातही राजकीय गोष्टींसाठी या निवडणुका घेतल्या जात नाहीत. जर निवडणुका घ्यायला हे तयार नसतील, तर ही हुकूमशाही आहे. 

हे ही वाचा >> Maratha Reservation: 'मराठ्यांनी उभा देश चालवायचा, आरक्षणाचं कुठून काढलं?', संभाजी भिडेंचा यू-टर्न

एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागले आहेत, ते सगळे ढोंगी आहेत. लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर काय होणार? एकनाथ शिंदे खोटं बोलत आहेत. राज ठाकरे पक्ष सोडताना मी सोबतच होतो.  एकनाथ शिंदे त्यावेळी ठाण्यात होते. त्यांना मुंबईत काही करता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना काय घडलं माहित नाही. शिंदे हल्ली चित्रपट निर्माते जास्त झाले आहेत. 'नमक हराम' हा चित्रपट मी काढणार आहे. त्यावेळी सगळ्या पटकथा मी देणार आहे, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा >> Sambhaji Bhide: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांनी भारतात आश्रय का घेतला? संभाजी भिडेंनी उलगडला 'तो' इतिहास

संभाजी भिडेंबाबत संजय राऊत काय म्हणाले? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात कोण गंभीरतेने घेत नाही. तसच राऊतांनी संभाजी भिडे यांचाही समाचार घेतला. संभाजी भिडे यांना उत्तर द्यायला मनोज जरांगे सक्षम आहेत. संभाजी भिडे यांच्याविषयी मला जास्त बोलायचं नाही. पण, ते आरएसएस संबंधित काम करतात हे मला माहिती आहे, असं राऊत म्हणाले. मुंबई गोवा महामार्ग दुःख कायम आहे. कोकणात जाणाऱ्या लोकांचे काय हाल होतात याचा साक्षीदार मी स्वतः आहे. आम्ही देखील आत्ताच कुटुंबीयांची चर्चा करत होतो की कसं जायचं, रस्ते इतके खराब आहेत. याचा पैसा कंत्राटदारांच्या मार्फत सरकारच्या खिशात जातो, असंही राऊत म्हणाले.

    follow whatsapp