Sanjay Raut New tweet On Macao, Chandrashekhar Bawankule : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काहीच दिवसांपूर्वी मकाऊतल्या कॅसिनोतले फोटो शेअर करून भाजपला आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना चांगलेच घेरले होते. यानंतर बावनकुळे यांनी स्वत: समोर येऊन मी कुटुंबियांसोबत मकाऊमध्ये असल्याची माहिती दिली होती. आणि त्या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवरच रेस्टॉरंट आणि कॅसिनो असल्याने जेवण केल्यानंतर कुणीतरी फोटो काढल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी नवीन ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी “मकाऊ की रातें” सूचक कॅप्शन लिहून पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. (sanjay raut new tweet macau politics chandrashekhar bawankule maharashtra bjp devendra fadnavis)
ADVERTISEMENT
संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज सकाळीच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मकाऊतल्या त्या हॉटेलचा असल्याची माहिती आहे. या ट्वीटमध्ये मकाऊतली ती संध्याकाळ…आणि पिक्चर अभी बाकी है! असे सूचक ट्वीट केले आहे. या ट्वीटने आता संजय राऊतांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.
प्रकरण काय?
संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक फोटो ट्वीट केला होता. हा फोटो मकाऊतील कसीनोचा होता. या फोटोच्या कॅप्शनला, ‘महाराष्ट्र पेटलेला आहे…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…, असे लिहून संजय राऊतांनी सस्पेन्स कायम ठेवला.
या ट्विटच्या लगोलग राऊतांनी आणखीण एक ट्वीट केले. ज्यामध्ये राऊतांनी मुक्काम पोस्ट मकाऊ असे लिहत कॅसीनोचा पत्ताच सांगितला. आणि कॅसीनोत संबधित व्यक्तीने 3.50 कोटी रूपये जुगारात उडवल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगितल्याचे राऊतांनी म्हटले. तसेच पुढे राऊतांनी हिंदुत्ववादी महाशय असल्याची ओळख सांगत सस्पेंन्स आणखीणच वाढवला. आणि खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असे म्हणत राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, संजय राऊतांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये संबंधित नेत्याचे नाव कुठेच घेतले नव्हते. फक्त हे ट्वीट भाजपला टॅग करण्यात आले होते.यानंतर भाजपच त्या नेत्याचे नाव सांगून बसली होती.
बावनकुळे काय म्हणाले ?
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे,, असा खुलासा करत बावनकुळे यांनी राऊतांच्या आरोपांच खंड़ण केले होते.
ADVERTISEMENT