Maharashtra politics Sanjay Raut Video : “तथाकथित राम भक्तांसाठी ‘ही’ स्मरण गोळी”, असे म्हणत संजय राऊतांनी भाजपला अटलबिहार वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचे बाबरी मशीद पाडल्यानंतर घेतलेल्या भूमिकेचे व्हिडीओ दाखवले. राऊतांच्या टीकेला भाजपनेही व्हिडीओ दाखवत उत्तर दिलं. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. (Maharashtra BJP Shares old Video of Thackeray faction leader Sanjay Raut)
ADVERTISEMENT
बाबरी मशीद पाडल्याच्या श्रेयवादावरून भाजप आणि शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात लढाई सुरू झाली. दोन्ही पक्षातील नेते वेगळेवेगळे दावे करताहेत. भाजपचे नेते पळून गेले होते. शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली, असे राऊत म्हणाले. त्याला देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि गिरीश महाजनांनी उत्तर दिले.
संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ
“महाराष्ट्रातील श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे… तथाकथित राम भक्तांसाठी ही स्मरण गोळी. Memory tablets उगाळून घ्या. आणखी देखील जालीम डोस आहेत, योग्य वेळी देऊच”, असे म्हणत राऊतांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपच्या त्यावेळेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी काय भूमिका मांडल्या होत्या, याचा व्हिडीओ शेअर केला.
हेही वाचा >> “मला 35 वर्षांपासून वेड लागलंय”, जरांगेंवर भुजबळ संतापले
भाजपनेही राऊतांना दाखवला व्हिडीओ…
बाबरी मशीद पाडल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर भाजपने संजय राऊत यांचा एका सभेतील व्हिडीओ शेअर केला. ज्यात संजय राऊत अयोध्येत राम मंदिर हवं असेल, तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही”, असे म्हणत आहेत.
हेही वाचा >> संजय राऊतांचा फडणवीस, शेलारांना ‘जालीम डोस’! दाखवला वाजपेयी-आडवाणींचा व्हिडीओ
“महाराष्ट्रातील श्रीमान उद्धव ठाकरे, श्रीमान संजय राऊत, श्रीमान आदित्य ठाकरे वैगरे वैगरे… तथाकथित मविआचे नेते, तुम्हाला ही ‘स्मरण गोळी’. Memory tablets. उगाळून घ्या. आमच्याकडे देखील आणखी जालीम डोस आहेत, योग्य वेळी देत राहूच”, असे राऊतांच्या शब्दात भाजपने उत्तर दिले आहे.
हेही वाचा >> महायुतीचे जागा वाटप कधी? शिंदेंच्या मंत्र्याने दिली महत्वाची माहिती
संजय राऊतांचं सभेतील विधान काय?
“आणि आपल्याला जर अयोध्येत राम मंदिर हवं असेल, तर पुन्हा एकदा मोदींशिवाय पर्याय नाही. फक्त अयोध्येत राम मंदिर नकोय. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तर लाहोर आणि कराचीमध्ये सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने राम मंदिरं बांधू. कारण आता पाकिस्तान फार काळ राहणार नाही”, असे बोलताना संजय राऊत दिसत आहे.
ADVERTISEMENT