छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात असलेल्या राम मंदिराबाहेर दोन गट भिडले. यावरून बुधवारी मध्यरात्री 12.30 वाजतानंतर प्रचंड दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरलं आहे. त्याचबरोबर राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई माध्यमांशी खासदार संजय राऊत म्हणाले, “”महाराष्ट्रात विविध मार्गाने धार्मिक आणि जातीय तणाव वाढावेत, दंगली व्हाव्यात, अस्थिरता राहावी, असं काम हे सरकार करत आहे. हे त्यांचं राजकारण आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आतातरी या सरकारचे डोके ठिकाणावर यावे. जनतेचे डोके ठिकाणावर आहे, सरकारचे डोके ठिकाणावर यावे.”
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
“या सरकारचा एकमेव हेतू आहे की, या राज्यात अशांतता निर्माण व्हावी. दंगली घडाव्यात. मूळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हाच प्रश्न आहे. मी वारंवार सांगतोय की, ते फडणवीस दिसत नाही. हे फडणवीस निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करताना दिसत आहे. त्याची कारणे शोधावी लागतील आणि ती कारणे जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीये. त्यांच्या चेहऱ्या नाराजी का आहे. छत्रपती संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारचे वातावरण निर्माण व्हावं, ही या सरकारची इच्छा आहे आणि त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करत आहेत”, असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.
सरकारची पत सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झाली -संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केलेल्या टिप्पणीबद्दल संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्र सरकारला नपूंसक म्हटले आहे. राज्यातील जनता गेल्या सहा-सात महिन्यांपासून तेच म्हणत आहे. नपुंसक, बिनकामाचे अशा अनेक उपाध्या सर्वोच्च न्यायालयाने लावल्या आहेत. यामागे आम्ही नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र सरकारविषयी निरीक्षण आहे. त्यावर या सरकारची पत, प्रतिष्ठा काय आणि हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आले आणि काम करत आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या एका वाक्यातून स्पष्ट झाले आहे”, अशी टीका राऊतांनी केली.
संबंधित वृत्त – छत्रपती संभाजीनगरात दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार
“मुख्यमंत्री स्वतःला गुलाम असल्याची जाणीव दररोज करू देत आहेत. बसू का, जेवू का, बोलू का, वाचू का, डोळे उघडू का? बोलू का बोलू नको ? त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने एका वाक्यात हल्ला केला आहे”, असं मत राऊतांनी मांडलं.
या सरकारचा जीव खोक्यांमध्ये आहे, राऊतांची टीका
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तीन जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, “यालाच नपुंसक सरकार म्हणतात. मंत्री भेटत नाही. मंत्रालयात आणि बाहेर सरकारचे अस्तित्व जाणवत नाही. सर्वोच्च न्यायालयाला या सरकारला नामर्द, नपुंसक, अस्तित्व शून्य सरकार म्हणावं लागलं. हे खोके सरकार आहे. या सरकारचा जीव खोक्यांमध्ये आहे.”
ADVERTISEMENT