Sanjay Raut Speech in Rajya Sabha : ‘पंडित नेहरूंच्या काळातही भरपूर नाल्या, गटारं होती, पण त्यातून गॅस काढून चहा बनवा असं ते म्हणाले नाही’, असं म्हणत शिवसेना (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्ला चढवला. (Sanjay Raut hits out At PM Narendra Modi)
ADVERTISEMENT
‘भारताचा गौरवशाली अंतराळ प्रवास’ या विषयावरील चर्चत संजय राऊत सहभागी झाले. यावर बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटे काढले.
संजय राऊत म्हणाले, “भारताचा अंतराळ प्रवास खूपच गौरवशाली आहे. सरकारं येतात आणि जातात. पंतप्रधानही आले आणि गेले. पण, भारताचा अंतराळ प्रवास निरंतर चालू आहे. हा पंडित नेहरू विरुद्ध नरेंद्र मोदी असा वाद व्हायला नको. तुम्ही तिकडून मोदी… मोदी म्हणणार आणि आम्ही नेहरू नेहरू म्हणणार. हे टीम वर्क आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
‘काही पंतप्रधान विज्ञानवादी असतात, तर काही अंधभक्त’
“2014 आधीही या देशात खूप सारं काम झालं आहे. त्यामुळेच आज चांद्रयान वरती गेलं आहे. पंतप्रधानांचे आपापले विचार असतात. काही विज्ञानवादी असतात. काही अंधश्रद्धावादी असतात. काही अंधभक्त असतात. काही भक्त असतात”, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला.
“पंडित नेहरूंच्या काळातही खूप साऱ्या नाल्या आणि गटारं होती. पण, पंडित नेहरू असं म्हणाले नाही की, गटारातून गॅस काढून चहा बनवा. हे सुद्धा विज्ञान आहे. गटारातून गॅस काढू शकतो, हे विज्ञान आहे पण, पंडित नेहरूंचा विचार वरचा होता. पंडित नेहरूंनी इस्रो बनवले.”
हेही वाचा >> Women Reservation : पवारांवर ‘बाण’, सुप्रिया सुळेंना चिमटा; नवनीत राणांनी चढवला हल्ला
“पंडित नेहरूंनी ज्या पद्धतीने ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया रचला. त्यामुळे आज आपण 70 वर्षात इथपर्यंत पोहोचलो आहोत. चांद्रयान मिशनचे यश अद्भूत आहे. हा जो प्रवास आहे. हा प्रवास चांद्रयान 1 पासून सुरू झाला होता. चांद्रयान 3 इतिहास रचला आहे. 60-70 वर्षातील टीम वर्कचे यश आहे”, असं संजय राऊत चांद्रयान 3 बद्दल बोलताना म्हणाले.
‘नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा सुई सुद्धा तयार होत नव्हती’
“जुन्या संसद भवनातील जी शेवटची संयुक्त बैठक झाली. त्यात पंतप्रधानांनी संबोधित केले आणि खासदारांसोबत चालत नव्या संसद भवनात आले. 1947 पासून आपल्या देशाचा प्रवास याच पद्धतीने होत आलाय. पंडित नेहरू, जे पहिले पंतप्रधान होते. त्यावेळी या देशात सुई सुद्धा तयार होत नव्हती. काहीच तयार होत नव्हतं. आज आपण चांद्रयान वर पाठवतोय”, असा इतिहास संजय राऊतांनी लोकसभेत बोलताना सांगितला.
हेही वाचा >> Women Reservation : 5 कारणं… जी सांगतात महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण का आवश्यक?
“आर्यभट्ट भारताचा पहिला उपग्रह होता. 1995 ला प्रक्षेपित करण्यात आलं होतं. ही गौरवशाली यात्रा आहे. आज इस्रो भारताचा गौरव आहे. विक्रम साराभाईंबद्दल जयराम रमेश यांनी कहाणी सांगितली. त्यांच्या वेळी खूप मोजकी टीम होती. पैशांची चणचण होती. पण, वर्षभरात भारताने पहिला उपग्रह प्रक्षेपित केला. त्याचे पार्टस् सायकलवरून नेण्यात आले होते. ते ऐतिहासिक छायाचित्र आजही आपल्या अंगावर शहारे आणते. आज सहा दशकानंतर आपण चंद्र, मंगळ, गगनयान… ही देणं 60-70 वर्षात होऊन गेलेल्या पंतप्रधानांची आहे. यात मोदीसुद्धा आहेत.”
‘पंतप्रधानांनी स्वतःचा फोटो लावून प्रचार केला’, राऊतांचा टोला
“पंतप्रधान म्हणाले की, ‘मजबूत भारत बनवायचा आहे. मोठ्या विचारांनीच भारताचे निर्माण होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय हा देश पुढे जाऊ शकणार नाही.’ पण, आपण कोरोना काळात काय बघितलं? पापड बेचो. थाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. हे विज्ञान आणि तंत्रज्ञान नाहीये. ही अंधश्रद्धा आहे. या देशातील वैज्ञानिकांनी लस बनवली. लस बनल्यानंतर त्याच्या कव्हरवर पंतप्रधानांनी फक्त स्वतःचा फोटो लावून प्रचार केला. हे चांगलं नाही. आपल्या वैज्ञानिकांचा आदर करायला हवा”, असं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
हेही वाचा >> Hardeep Singh Nijjar : कोण होता खलिस्तानी दहशतवादी? ज्याच्या हत्येने भारत-कॅनडा संबंध झाले खराब
“हा देश खूप मोठा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा राजकारण करण्याचा विषय नाहीये. राजकारण करण्यासाठी खूप सारे विषय आहेत. पण, काही लोकांनी या विषयातही राजकारण आणले. यात राजकारण करायला नको होतं. काही लोकांनी तेलंगणा विरुद्ध आंध्र प्रदेश असा वाद लावून दिला”, अशा शब्दात संजय राऊतांनी मोदी सरकारवर बाण डागले.
ADVERTISEMENT