Ajit Pawar: राज्यातील राजकीय घडामोडींना आता प्रचंड वेग आला आहे. त्यातच नुकताच वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपने (BJP) मुख्यमंत्री पदीही अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विधानसभांच्या निवडणुकानंतर आता राजकीय नेत्यांना लोकसभेचे वेध लागल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच विरोधी पक्षनेते असताना अजित पवार सत्तेत सामील होत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जात त्यांचे समर्थन केले आहे, मात्र आता अजित पवारांनाचा आता एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण अजित पवारांच्याच बालेकिल्ल्यातील त्यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरेंनी (sanjog waghere) मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे.
ADVERTISEMENT
वाघेरे मातोश्रीवर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजोग वाघेरे यांनी आता थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राजकारण ढवळून निघाले आहे. संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा >> मनोज जरांगेच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, एका मागून एक लांबवले दागिने
अजित पवारांचे कट्टर
पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिकिल्ला समजला जातो. अजित पवारांच्या या बालेकिल्ल्यात संजोग वाघेरे यांचंही नाव मोठं आहे. कारण त्यांच्या वडिलांपासून त्यांच्यापर्यंत त्यांनी राष्ट्रवादीसोबत एकनिष्ठपणे काम केले आहे. मात्र राष्ट्रवादीत फूट पडली आणि त्यांची चलबिचल सुरु झाली. कारण लोकसभेसाठी त्यांनी दोन वेळा तयारी करूनही आताही त्यांनी ती संधी गमावयाची नाही. त्यामुळेच अजित पवारांचे कट्टर समजले जाणारे वाघेरे यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यामुळे आता अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. मावळमधून आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे.
दोन टर्म तयारी
अजित पवार गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी याबाबत सांगितले की, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची मी सदिच्छा भेट घेतली, त्यातच आता लोकसभेचेही पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेसाठी दोन टर्म मी तयारी केली आहे, मात्र त्यावेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मला संधी मिळाली नाही. त्यामुळे यावेळी तरी मला लोकसभेसाठी संधी मिळावी अशी इच्छा मी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT