पाय धरले अन्… शरद पवार-अजित पवार भेटीत नेमकं काय झालं? त्या 20 मिनिटांची Inside Story

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झाली. गेल्या तीन दिवसांतील पवार काका-पुतण्यामधील ही दुसरी भेट आहे. यावेळी अजित पवारांनी आपल्या सर्व मंत्र्यांसह शरद पवारांच्या दरबारात हजेरी लावली. याच 20 मिनिटांत नेमकं काय घडलं?

what happened in sharad pawar and ajit pawar meeting in mumbai?

what happened in sharad pawar and ajit pawar meeting in mumbai?

मुंबई तक

16 Jul 2023 (अपडेटेड: 16 Jul 2023, 12:59 PM)

follow google news

Sharad Pawar-Ajit Pawar Meeting in Mumbai : अजित पवारांनी शरद पवारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रविवारी (16 जुलै) दुपारी अचानक भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झाली. गेल्या तीन दिवसांतील पवार काका-पुतण्यामधील ही दुसरी भेट आहे. यावेळी अजित पवारांनी आपल्या सर्व मंत्र्यांसह शरद पवारांच्या दरबारात हजेरी लावली. याच 20 मिनिटांत नेमकं काय घडलं? अजित पवारांच्या ऑफरवर पवार काय म्हणाले? पवारांकडे कुणी दिलगिरी मागितली आणि त्या स्फोटक भाषणाबद्दल अजित पवारांनी काय खुलासा केला? याचीच ही इन्साईड स्टोरी

हे वाचलं का?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांच्या नेतृत्वात हे बंड झालं. राष्ट्रवादीतील आमदार फोडून अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाले. 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतरच 5 जुलै रोजी दोन्ही गटांनी आपापल्या समर्थकांची वेगवेगळ्या ठिकाणी बैठक घेतली.

याच बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांवर सनसनाटी आरोप केले. काका तुम्ही रिटायर व्हा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचे वाभाडे काढले, पण तेच अजित पवार पंधरा दिवसांत आपले सगळे मंत्री आणि नेत्यांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

वाचा >> शरद पवारांची साथ सोडलेल्या ‘या’ मातब्बर नेत्यांचं काय झालं?, ‘या’ दिग्गजांनी गमावलीय आमदारकी

रविवारी म्हणजे 16 जुलैला दुपारी एकच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ही भेट झाली. कोणतीही पूर्वकल्पना न देता अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला पोहोचला. अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे पवारांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही तातडीनं वायबी सेंटरला बोलावून घेतलं.

शरद पवार-अजित पवार बैठकीत काय घडलं?

बंडानंतर पहिल्यांदाच दोन्ही गटांचा आमना-सामना झाला. याच बंद दाराआडच्या भेटीची इन्साईड स्टोरी मुंबई Tak च्या हाती लागलीये. या सर्व घडामोडींचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या सुत्रांनी या भेटीबद्दलची माहिती दिली. आता आपण बंद दाराआडच्या बैठकीत नेमकं काय घडलं तेच आपण बघूया.

 

अजित पवार यांच्या गटाचे प्रमुख नेते असलेले प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना आम्ही शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असं सांगितलं. तर अजित पवारांच्या गटाने शरद पवारांची बंडाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे बंडानंतर अजित पवार गटातील नेत्यांच्या भेटीचे बरेच अर्थ काढले जात आहे.

    follow whatsapp