‘साहेब आणि दादा आजही एकत्रच’, अजित पवारांचं शरद पवारांबद्दल भुवया उंचावणारं विधान

मुंबई तक

01 Aug 2023 (अपडेटेड: 01 Aug 2023, 12:32 PM)

शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि मी तेव्हाही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका, असे सूचक विधान उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. शिरूर-हवेलीचे भाजपचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.

sharad pawar and me together ajit pawar big statement on after ncp split maharashtra politics

sharad pawar and me together ajit pawar big statement on after ncp split maharashtra politics

follow google news

स्मिता शिंदे, जुन्नर,पुणे : शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि मी तेव्हाही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका, असे सूचक विधान उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. शिरूर-हवेलीचे भाजपचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार यांनी केलेल्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (sharad pawar and me together ajit pawar big statement on after ncp split maharashtra politics)

हे वाचलं का?

अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार यांच्या या भूमिकेला शरद पवार यांनी अद्याप समर्थन दिले नाही. मात्र अजित पवार यांनी दोनदा शरद पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले होते. मात्र ही मनधरणी काही यशस्वी ठरवी नव्हती. त्यानंतर आता अजित पवार यांनी शरद पवार साहेब आणि मी तेव्हाही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका, असे सूचक विधान केले आहे. शिरुरमधील विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारातील एक अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा अजित पवारा यांनी केला आहे.

हे ही वाचा : PM Modi in Pune : “शरद पवार यांना संधी साधता आली असती”, ठाकरेंचे चिमटे

काय म्हणाले अजित पवार?

शिरुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीवेळी पोपटराव गावडे शरद पवारांचे समर्थक म्हणून तर बाबुराव पाचर्णे अजित पवारांचे समर्थक असल्याचा शिरुरमध्ये प्रचार झाल्याचे खुद अजित पवारांनी सांगितले. पण साहेब आणि मी काय वेगळे होतो का, तेव्हा ही वेगळे नव्हतो आणि आताही वेगळे नाही आहोत. पण तो एक काळ झाला, तशापद्धतीने प्रचार झाला होता, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितले.

‘शरद पवारांची सवय’

अजित पवार नेहमी भल्यापहाटे कार्यक्रम घेत असतात असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी सकाळी लवकर कामाला सुरूवात करण्याची सवय लावलीय. शेवटी आपण लोकांना कशा सवयी लावतो, यावरच सगळ अवलंबून असतं. म्हणूनच सकाळी सातलाच कामाला सूरूवात करत असल्याचे स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले आहे.

वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली तरुणांनी राजकारण आणि समाजकारणात यायला हवं. पुर्वीपासून राजकारणात तरुणांमध्ये एक वेगळं आकर्षक आहे.त्यामुळे तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी तरुणही सक्रिय राजकारण व समाजकारणात यायला हवेत असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तरुणांना राजकारणात संधी देण्यासाठीचे संकेतही अप्रत्यक्षरित्या आज शिरुरमध्ये दिले आहेत.

    follow whatsapp